Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणीत मनपा अधिकारी- कर्मचाऱ्यांचे कामबंद- निषेध आंदोलन 





परभणी ➡️ ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे व त्यांचे अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा निषेध म्हणून मंगळवारी (दि. 31) परभणी महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी,अधिकारी यांनी कामबंद आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. 




याबाबत जिल्हा प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परभणी शहर महानगरपालिका सर्व अधिकारी-कर्मचारी यांचा जाहीर निषेध उपरोक्त विषयास अनुसरुन आपणास निवेदन करण्यात येते की, दि. 30 ऑगस्ट 2021 रोजी ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त  कल्पिता पिंपळे माजीवाडा प्रभाग समिती या सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास अतिक्रमण विरोधी पथक घेवून अनाधिकृत हातगाड्यांवर कारवाई करत असतांना तेथील गुन्हेगारी प्रवृत्तीचे हातगाडे फेरीवाले अमरजीत यादव यांनी त्यांच्यावर व त्यांचे अंगरक्षक सोनाथ पारवे यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला करुन या दोघांनाही गंभीर दुखापत केली आहे. 


या हल्ल्यात सहाय्य आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या डाव्या हाताची दोन बोटे पूर्णपणे तुटून रस्त्यावर पडली. व उजव्या हाता अंगठ्यासही गंभीर दुखापत झाली आहे. तसेच त्यांच्या डोक्यावर मार लागला आहे. अंगरक्षक श्री सोमनाथ पालवे यांच्या डाव्या हाताचे एक बोट पूर्णपणे तुटून पडले. झालेला प्रकार अतिशय गंभीर असून निंदनीय आहे. एक महिला अधिकार्‍यावर अशा प्रकारचा हल्ला होणे ही नक्कीच अत्यंत चिंताजनक बाब असून याचा आम्ही परभणी शहर महापालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी संघटनेच्यावतीने जाहीर निषेध व्यक्त करतो. 


निवेदन दिलेल्यानंतर मनपाचे आयुक्त देविदास पवार, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील हे देखील आंदोलनात सहभागी झाले. महापालिकेने अंतर्गत उमेश जाधव, दिलीप बनसोडे, सतीश भुसारे, मोहम्मद मंजूर , मुजीब रहमान निळोबा सुरवसे, सुलभा सरदेशपांडे , सीताबाई तांबे , विश्वनाथ भुजाडे , मंगल बिडकर , मनोज खानापूरकर , करूणा स्वामी , प्रिया जोशी , मंगल वाघमारे , दादाराव आर्यनमोरे , प्रकाश पाळणे, सय्यद मुजाहिद्दीन पठाण तय्यब, किरण गरुड, सत्यभामा देऊळगावकर, शेख मेहमूद, एस.जी.टेकाळे, सुनील थांबरे, पी.जी.भागवत, एस.बी.खुळे, डीएम हाके , सोनवणे कैलास काकडे , संदीप पवार, दिगंबर कुलकर्णी आदींनी महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर येऊन त्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.


या अनुषंगाने आज दि. 31 ऑगस्ट रोजी परभणी शहर महानगरपालिका बंद ठेवण्यात येत आहे. अशा आशयाचे निवेदन महापौर अनिता सोनकांबळे, उपमहापौर भगवानराव वाघमारे यांना देण्यात आले. यावेळी संघटनेच्यावतीने काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली व कामबंद आंदोलन करण्यात आले. अशा आशयाचे महाराष्ट्र मुख्य अधिकारी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्र एकनाथ शिंदे, आमदार सुरेश वरपुडकर,गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देण्यात आले.





Post a Comment

0 Comments