Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणीत भाजपा महिला मोर्चा तर्फे घंटानाद आंदोलन  




 

परभणी ➡️ राज्यातील मदिरालय, जुगार अड्डे सुरू आहेत. परंतु महाराष्ट्र राज्य शासनाने मंदिरांना मात्र अद्याप उघडण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे लोकांच्या श्रध्दा आणि भावनेची हेळसांड करणाऱ्या सरकारचा निषेध असो अशा घोषणा देत सोमवारी (दि. 30) भाजपा महिला मोर्चा परभणी महानगरतर्फे शहरातील वसमत रोडवरील चिंतामणी मंदिरसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. 

राज्य सरकारने गेल्या पाच ते सहा महिन्यापासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे पुन्हा बंद करून ठेवली आहेत. आता सर्व व्यवहार सुरळीत झाले असताना फक्त मंदिर बंद ठेवलेली आहेत. मंदिरावर अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या उपजीविकेवर गदा आल्याने त्यांची उपासमार होत आहे. त्यांना राज्यसरकार कसलीही मदत करत नाही आणि मंदिर ही उघडली जात नाही देशातल्या अन्य राज्यात मात्र मंदिर सुरू आहेत. 


म्हणूनच देव धर्मावर सातत्याने अन्याय करणाऱ्या ठाकरे सरकारला मंदिर खुली करावे यासाठी श्रीकृष्ण जयंतीच्या व चौथ्या श्रावण सोमवार च्या पवित्र मुहूर्तावर भाजपाच्या वतीने श्री चिंतामणी महाराज मंदिर येथे शंखनाद आंदोलन करण्यात आले . 


यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य मोहन कुलकर्णी, मनपा सदस्य मधुकर गव्हाणे,महिला जिल्हाध्यक्षा सौ.सुप्रिया कुलकर्णी, सरचिटणीस दिनेश नरवाडकर,उपाध्यक्षा सौ. प्रभावती अन्नपुर्वे,अनंत बनसोडे,सौ.शंकूतला मठपती,युवती मोर्चा अध्यक्षा गीताजंली सुर्यवंशी,कामगार आघाडी संयोजक रोहित जगदाळे,आत्मनिर्भर भारत योजना संयोजक गणेश देशमुख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments