Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

पाली भाषेतील सीमाने केले धम्मग्रंथाचे वाचन 





जिंतूर ➡️ तालुकयातील केहाळ येथे आषाढी पौर्णीमेपासुन सुरु असलेल्या बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथ वाचनाचा रविवारी सांगता समारोह पार पडला. यावेळी सिमा किशन घुगे या 15 वर्षीय मुलीने पाली भाषेतील धम्म ग्रंथाचे वाचन केले. कार्यक्रमात उपस्थितांनी सर्वांनी तिचे कौतुक केले. 


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपब्लीकन सेनेचे तालुकाध्यक्ष शरद चव्हाण होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सतिष वाकळे होते. याप्रसंगी पंचशिलाच्या आचरणाने समस्त मानव जातीचे कल्याण होईल, असे प्रा.थॉमस पडघन, भारतीय बौद्ध महासभा तालुका उपाध्यक्ष बौद्धाचार्य शिवाजी लाटे व भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सचिव बौद्धाचार्य आनंद वाकळे यांनी प्रतिपादन केले. 


या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सिद्धार्थ खरात यांनी केले. शिवाजी सरकटे यांनी आभार मानले. माजी पोलीस पाटील माधवराव लाटे मोकींदराव लाटे, दगडू खरात, सोपान प्रधान, सुदामराव सरकटे, पंकज चव्हाण आदींनी प्रयत्न केले.




Post a Comment

0 Comments