Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

जिंतूर ग्रामीण रुग्णालयात 50 कुपोषित बालकांची आरोग्य तपासणी 





जिंतूर ➡️ शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे तालुक्यातील विविध भागात वास्तव्यास असलेल्या कुपोषित बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी 50 कुपोषित बालकांची आरोग्य तपासणी आज करण्यात आली आहे. 


तालुक्यातील वेगवेगळ्या ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या कुपोषित बालकांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक नागरगोजे आणि वैद्यकीय अधिक्षक डॉ रविकिरण चांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील ग्रामीण रुग्णालयात तालुक्यातील तब्बल 50 कुपोषित बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 


यावेळी डॉक्टर सागर वाल्हेकर, डॉक्टर अर्चना भायकर, डॉक्टर प्रशांत बामणे, सौ स्वाती गिरी, सौ सारिका जाधव आदिंनी बालकांच्या हिमोग्लोबिनची तपासणी तसेच वजन-उंची दंडघेर तपासणी करून बालरोग तज्ञ द्वारे तपासून वजन वाढीसाठी औषधे देण्यात आली. तपासणी शिबिराच्या यशस्वीतेसाठी फार्मसिस्ट समीर, अनिल सावंत, लॅब तंत्रज्ञ घुगे, अमोल राठोड यांनी परिश्रम घेतले.




Post a Comment

0 Comments