Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

पुर्णेत पालिका कर्मचार्‍यांकडून काळ्याफिती लावून निषेध





परभणी ➡️ पूर्णा ठाणे महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त व त्यांचे अंगरक्षक यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज पुर्णा नगर पालिका कर्मचार्‍यांनी काळ्याफिती लावून निषेध व्यक्त करत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. 


याप्रकरणी तहसिलदारांना निवेदन दिले आहे. ठाणे महापालिका हद्दीत अतिक्रमणविरोधी पथक घेऊन अनाधिकृत हातगाड्यांवर कारवाई करत असताना सहायक आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे व त्यांचे अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या हातगाडी फेरीवाल्यांंनी तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला करून दोघांना गंभीर जखमी केले. त्यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा पुर्णा पालिकेच्या कर्मचार्‍यांनी काळ्याफिती लाऊन निषेध व्यक्त केला.


हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे. या निवेदनावर पालिकेच्या उत्तम कांबळे, गणेश रापतवार, बाबु पठाण, सुरेंद्र धुळे, सदानंद कराळे, साई दुधे, सिध्दार्थ गायकवाड, साहेबराव मुरके, कैलास माकुलवार, गोविंद कपाटे, प्रविण वघोदे, नरहरी सातपुते, माया दोमोदर, आम्रपाली जमदाडे, रशमी पाठक,, यशवंत गायकवाड आदीं कर्मचार्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.




Post a Comment

0 Comments