Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन, सलग 11 वेळा आमदारकी भुषवली





सोलापूर ➡️ महाराष्ट्राच्या राजकारणातील जेष्ठ नेते आणि सलग 55 वर्ष आमदार राहिलेले गणपतराव देशमुख यांचे 30 जुलै रोजी शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजता अश्विनी हॉस्पिटल सोलापूर येथे उपचार दरम्यान निधन झाले. वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. 


अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल 55 वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून गणततराव देशमुख यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या पित्ताशयाचे ऑपरेशन पार पडलं. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मावळली.त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.

गणपतराव देशमुख यांचा जन्म 10 ऑगस्ट 1927 रोजी झाला. 1962 ला त्यांनी सांगोल्यातून सर्वप्रथम निवडणूक लढली होती. सुरूवातीपासून गणपत देशमुख शेतकरी कामगार पक्षात होते. 1978 मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापन केले होते. त्यावेळी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला.  1999 मध्ये गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. 2012 मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास 50 वर्षे पूर्ण झाल्याने सभागृहासह सरकारनेही त्यांचा गौरव केला होता. 2019 ला राजकारणातून निवृत्ती घेतली. नातू डॉ. अनिकेत देशमुख याने या मतदारसंघात निवडणूक लढवली.

अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतराव देशमुख यांनी तब्बल 54 वर्षे सांगोला मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे . गणपतराव देशमुखांनी 11 टर्म आमदारकी भुषवली. 1972 आणि 1995 च्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता ते सलग आमदार राहिले. 1972 च्या निवडणुकीमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला असला तरी ते त्यानंतर झालेल्या 1974 च्या पोटनिवडणुकीत निवडून आले होते.

सांगोल्यासारख्या अतिदृष्काळी तालुक्यात विकासाचा मळा फुलवला. शेकापच्या विळा आणि हतोड्याच्या झेंड्याप्रमाणे कामगार आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यात त्यांनी आग्रणी भूमिका घेतली. महाराष्ट्राच्या अनेक बड्या नेत्यांना उदय आणि अस्त त्यांनी पाहिलाय. 




Post a Comment

0 Comments