Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

पाथरीत फोर व्हिलर वाहनांचा वापर गुटख्याच्या तस्करीकरता, 05 लाखाचा गुटखा जप्त





परभणी ➡️ गुटख्याच्या तस्करीसाठी अवैध गुटखा विक्रेते वेगवेगळ्या शक्कल लढवत असल्याचे दिसत आहे. गुटख्याच्या तस्करीकरीता महागड्या फोर व्हिलर वाहनांचा वापर केला जात आहे. पाथरी पोलिसांनी गुरुवार 29 जुलैच्या रात्री गुटख्या विक्रेत्यांवर केलेल्या तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये 04 लाख 92 हजार 600 रुपये किंमतीच्या गुटख्यासह 25 लाख 52 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एकूण 10 आरोपींविरोधात पाथरी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. 


पाथरी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे प्रथम माजलगाव ते मानवत रोडवर केलेल्या कारवाईत सर्जेराव प्रल्हाद शिंदे, शिवाजी दत्तराव शिंदे, अशोक सक्राते यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दुसरी कारवाई तालुक्‍यातील हादगाव येथे करण्यात आली. पोलिसांनी ज्ञानेश्वर श्रीराम साहकुडकर, आकाश किशोरप्रसाद तिवारी, अशोक सक्राते, बाबा नखाते यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

तिसरी कारवाई माजलगाव रोडवरील ढालेगाव येथे करण्यात आली. या कारवाईत नुरोद्दीन कलीमोद्दीन अन्सारी, अब्दुल मुजाहिद अब्दुल वाहेद अन्सारी, रईस अन्सारी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही कारवायात मिळून पोलिसांनी राजनिवास, गोवा, जाफरानी जर्दा आदी 04 लाख 92 हजार 600 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. वाहन, मोबाईल इतर साहित्य व गुटखा मिळून 25 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.






Post a Comment

0 Comments