Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

भविष्यातील गरज ओळखून कौशल्य प्रशिक्षणासाठी मल्टिपर्पज हॉलचा वापर व्हावा - पालकमंत्री नवाब मलिक





जिंतूर ➡️  ग्रामीण भागामध्ये एका बाजूला कृषी क्षेत्राला लागणारे कुशल मणुष्यबळ याची वानवा आहे. तर दुसऱ्या बाजुला युवक हे रोजगाराच्या प्रतिक्षेत आहेत. याची सांगड घालून आज व उद्याच्या गरजा लक्षात घेवून कौशल्य विकासाच्या विविध योजनांना आपण चालना दिलेली आहे. कौशल्य प्रशिक्षणासाठी नगर परिषदेतर्फे उभारण्यात आलेल्या या मल्टीपर्पज हॉलचा उपयोग करुन या ठिकाणी लग्न व इतर कार्यक्रमासह प्रशिक्षणाची जोड देवू अशी घोषणा परभणी जिल्हयाचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी केली.


जिंतूर नगर परिषदे अंतर्गत जमजम नवी अबादी वार्डात सुमारे 2 कोटी 15 लक्ष निधीतून उभारण्यात आलेल्या बहुउद्देशीय सभागृहाचे उद्दघाटन व विविध विकास कामाच्या लोकापर्ण सोहळयात ते बोलत होते. यावेळी जिंतूरचे माजी आमदार विजयरावजी भांबळे, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, जिंतूरच्या नगराध्यक्षा सबीया बेगम कफीलुररहेमान फारुकी व इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

काळानुरुप स्थानिक स्वराज्यसंस्था व शासनाच्या ज्या काही सेवा सुविधा उपलब्ध आहेत. त्या मल्टीपर्पज हॉलसारख्या सुविधांचा अधिकाधिक कुशलतेने वापरावर भर दिला पाहिजे. अशा मोठया वास्तु वर्षातील केवळ काही दिवसापुरत्याच उपयोगात येण्याऐवजी इतर दिवसातही लोकांच्या उपयोगी पडल्या पाहिजेत. या दृष्टीने त्या त्या भागातील युवकांना त्यांच्या गरजेनुरुप प्रशिक्षणासाठी त्या उपयोगात आल्या पाहिजेत असेही त्यांनी स्पष्ट केले. जिंतूर येथील कबरस्तानाच्या जागेसंदर्भात लवकरच स्वतंत्र बैठक घेवून हा विषय मार्गी लावू असे त्यांनी स्पष्ट केले. 

कोव्हीड सारख्या आवाहनात्मक काळात परभणीला आपले सर्व कौशल्य पणाला लावून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केलेल्या विशेष कामांचा पालकमंत्री नवाब मलीक यांनी गौरव केला. या बहुउद्देशीय सभागृहाच्या लोकापर्ण सोहळ्याच्या औचित्याने आपली आठवणही ही वास्तु जपुन ठेवेल असे भावनिक उद्दगार त्यांनी काढले. शासनातर्फे ज्या भागात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे त्यांना न्याय देवू असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांचे समोयोचित भाषण झाले. कोणतेही येणारे आवाहने आपल्या सोबत मार्ग घेवून येत असतात. फक्त सयमाने आपण त्यांना तोंड दिले पाहिजे असे मुगळीकर यांनी सांगितले.





Post a Comment

0 Comments