Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

पालकमंत्री नवाब मलिक यांचा परभणी जिल्‍हा दौरा कार्यक्रम




परभणी ➡️ राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे मंत्री तथा परभणी जिल्‍ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार दि. 30 जुलै 2021 रोजी औरंगाबाद येथून मोटारीने देवगाव फाटा ता.सेलू येथे दुपारी 1:45 वाजता आगमन व अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानीची पाहणी, दुपारी 2 वाजता जिंतूरकडे प्रयाण, दुपारी 2:30 वाजता जिंतूर येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वाजता नगरपरिषद जिंतूर येथील मौलाना हुसेन अहेमद मदनी कम्युनिटी हॉल लोकार्पण सोहळा व कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश सोहळ्यास उपस्थिती. सायंकाळी 4 वाजता कम्युनिटी हॉल येथून प्रयान व श्री संत भगवान बाबा चौक येथे नगर परिषदेचे स्ट्रीट लाईट व हायमास्क विकास कामांचा लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. 

सायंकाळी 4:15 वाजता जिंतूर येथून चांदजकडे प्रयाण, सायंकाळी 4:25 वाजता आगमन व करपरा नदी काठी अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करतील. सायंकाळी  4:40 वाजता बोरीकडे प्रयाण करतील. सायंकाळी 4:50 वाजता बोरी येथे आगमन व बोरी बसस्थानक ते करवली टी पॉईंट मेन रोड बोरी येथे सी.सी. रोड व नाली बांधकाम शुभारंभास उपस्थिती. 

सायंकाळी 5 वाजता ग्रामपंचायत बोरी नूतन इमारतीचा व इतर कामांचा लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. सायंकाळी 5:45 वाजता राखीव. सायंकाळी 6:15 वाजता डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम सभागृहाचे लोकार्पण करतील ( स्थळ :- परभणी रोड बोरी). सायंकाळी 6:45 वाजता बोरी येथून परभणीकडे मोटारीने प्रयाण, सायंकाळी 7:30 वाजता परभणी येथे आगमन राखीव व मुक्काम करतील. 

शनिवार दि. 31 जुलै 2021 रोजी सकाळी 9 वाजता परभणीचे जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा ( स्थळ-  जिल्हाधिकारी कार्यालय परभणी). सकाळी 10 वाजता जिल्हा नियोजन समिती बैठकीस उपस्थिती  ( स्थळ-  जिल्हाधिकारी कार्यालय परभणी). दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद  ( स्थळ-  जिल्हाधिकारी कार्यालय परभणी).  


दुपारी 1:30 वाजता पाथरी येथे वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या समस्येबाबत परभणी महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्यासमवेत बैठकीस उपस्थिती ( स्थळ-  जिल्हाधिकारी कार्यालय परभणी). दुपारी 2 ते 3 वाजता राखीव. दुपारी 3 वाजता परभणी येथून मोटारीने पाथरीमार्गे औरंगाबादकडे प्रयाण करतील.

                




Post a Comment

0 Comments