Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

पाळोदीतील ‘त्या’ मेंढपाळाच्या कुटूंबियांना सरकारद्वारे आर्थिक मदत





परभणी
➡️ मानवत तालुक्यातील पाळोदी शिवारात वीज कोसळल्याने मृत्यू पावलेल्या ज्ञानेश्‍वर तुकाराम टरफले या युवकाच्या कुटूंबियास राज्य सरकारने 04 लाख रुपयांची आर्थिक मदत आज सुपूर्द केली.

या शिवारात वादळी वार्‍यासह पाऊस व विजेचा लखलखाट सुरू होताच. ज्ञानेश्‍वर तुकाराम टरफले यांच्या अंगावर विज पडून जागीच मृत्यू झाला होता. गुरुवारी (दि.29) सकाळी अकरा वाजता शासनाच्या वतीने चार लाख रुपयांचा धनादेश संबंधितांच्या कुटूंबियांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका प्रेरणा वरपुडकर व मानवतचे तहसीलदार डी. डी. फुफाटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आमदार सुरेश वरपुडकर यांनी या कुटूंबियास आर्थिक मदत मिळावी म्हणून शासन दरबारी पाठपुरावा केला होता.

यावेळी तलाठी पारतुले, सिध्देश्‍वर लाडाने, बाबुरावजी बुरुड, चंद्रकांत सुरवसे, बाबासाहेब अवचार, आसाराम काळे, बालासाहेब भांगे, शिवराज पिंपळे, सरपंच सुरज काकडे, उपसरपंच तौफिक पठाण, चेअरमन हरिश्‍चंद्र काकडे, प्रकाश काकडे, परमेश्‍वर काकडे, नारायण काकडे, आसाराम काकडे, रियाज पठाण,  ग्रामस्थ उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments