Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

ऑल इंडिया पेंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्षा वरील प्राणघातक हल्ल्याचा निषेधार्थ सेलू पोलीस ठाण्यासमोर मोर्चा व ठिय्या आंदोलन






सेलू  ➡️ येथे ऑल इंडिया पेंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्यावर सेलूतील रायगड कॉर्नर वर ता. 30 जुलै रोजी रात्री दहा साडे दहाच्या दरम्यान  काही लोकांनी गाडी वर  दगडफेक करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली यात ऑल इंडिया पॅंथर सेनेचे परभणी जिल्हा अध्यक्ष भीमराव गोटे गंभीर जखमी झाले असून या घटनेच्या निषेधार्थ सेलू तालुक्यातील दलित सामाजिक कार्यकर्त्यांनी ता. 31 जुलै रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासुन सेलू पोलीस स्टेशन वर मोर्चा काढून तेथे ठिय्या आंदोलन केले.

 



या दरम्यान पोलिस निरीक्षक सरला गाडेकर यांना निवेदन ही देण्यात आले .त्याची माहिती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब जयंत मीना यांना कळताच त्यांनी तात्काळ  संबंधाशी असलेली सर्व माहिती घेऊन आरोपींना दोन दिवसात अटक केली जाईल असे आश्वासन दिले . आरोपींना अटक नाही झाली पूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन पेटेल याची प्रशासनाने नोंद घ्यावी अशी जाहीर सभेत मागणी करण्यात आली या निषेध मोर्चामध्ये दलित समाजाचे कार्यकर्ते अशोक अंभोरे , मिलिंद सावंत ,ॲड.विष्णू ढोले, सुबोध काकडे, बालकिशन साळवे,बापू धापसे, राहुल जाधव यांच्यासह तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते हजर होते.




Post a Comment

0 Comments