Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

लोकजागर कला पथका मार्फत चारठाणा येथे जनजागृती पर कार्यक्रम






जिंतूर ➡️ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग जिल्हा माहिती कार्यालय परभणी यांच्या वतीने कला पथका मार्फत विविध योजना व लाभाची जनजागृती करण्यात येत असून जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे लोकजागर कला पथक शाहीर भारत मुंजे आणी कलासंचाने येथील बौद्ध नगर परिसरात दि. 30 जुलै रोजी सकाळी 9:00 वा कार्यक्रम घेऊन आपल्या कलेच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती दिली सदर कार्यक्रम श्री रापतवार साहेब  जिल्हा माहिती अधिकारी परभणी यांच्या आदेशानुसार होत असल्याची माहिती शाहीर भारत मुंजे यांनी दिली. 


ध्यास आमुचा,"सामाजिक समतेचा "हा जनजागृती कार्यक्रम  जिंतूर तालुक्यातील  जोगवाडा (सोस),वाघी (धा .) येथे पार पडले चारठाणा येथिल कार्यक्रम सुध्दा त्याचाच भाग असल्याचे ते म्हणाले सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या विविध योजनांची माहिती दिली.


त्यामध्ये रमाई आवास योजना, मुलां-मुलींसाठी शासकीय वसती गृह ,भारत सरकार शिष्यवृत्ती, राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, कन्यादान योजना आदी योजनांची माहिती आपल्या शाहिर लोककलेतून त्यांनी दिली कार्यक्रमासाठी ग्रा.प.सदस्य नानासाहेब निकाळजे, महेंद्र निकाळजे, सचिन निकाळजे यांच्या सह अनेक नागरिकांची उपस्थिती होती.




Post a Comment

0 Comments