Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

प्रियदर्शिनी ग्रामीण बिगरशेती महिला सहकारी पतसंस्थेचा केरवाडी येथे वृक्षारोपण






परभणी ➡️ प्रियदर्शिनी ग्रामीण बिगरशेती महिला सहकारी पतसंस्थेने 200 झाडांचे वृक्षारोपण केले  आज दिनांक 31 जुलै  रोजी प्रियदर्शिनी ग्रामीण बिगरशेती महिला सहकारी पतसंस्था म.केरवाडी आणि सहाय्यक निबंधक कार्यलय, पालम यांच्या संयुक्त विद्यमाने केरवाडी येथे करंजी, कांचन व शिरस या अश्या 200 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. 


या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी पालम तालुक्याचे सहाय्यक निबंधक गिनगिने, मुख्य लिपिक किरण नंदापूरकर आणि प्रियदर्शिनी  पतसंस्थेचे चेअरमन गंगा माने चंद्र्प्रभावती पांचाळ उपस्थित होते. तसेच प्रियदर्शिनी पतसंस्थेचे संचालक सीमा जाधव, विमल बडवणे, कालिंदी जाधव यांची उपस्थिती होती. तसेच या संस्थेचे सभासद लता सारंग, सुरेखा चामले,विद्या बडोले, सरस्वती काळे, संगीता जाधव, उर्मिला कुगणे यांनी या वृक्षरोपण कार्यक्रमात सहभाग नोंदविला. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आनंद बडवणे, अंकुश वाघमारे, रामभाऊ जाधव, प्रभाकर पुंड, नामदेव शिंदे यांनी परिश्रम घेतले .




Post a Comment

0 Comments