Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

दोन दिवसांत 11 जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यातील सर्व निर्बंध पूर्णतः शिथील होणार






परभणी ➡️  राज्यातील 11 जिल्हे वगळता 25 जिल्ह्यातील निर्बंधांमुळे शिथिलता दिली जाईल, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी (दि.29) मुंबईतून जाहीर केले. त्यात मराठवाड्यातील बीड अपवाद अन्य सर्व जिल्ह्यातील निर्बंधांमध्ये शिथिलता येईल, असे स्पष्ट संकेत आहेत.
👇 Video 👇


मुंबईत गुरुवारी टास्क फोर्सच्या सदस्यांची व्यापक बैठक झाली. त्यातून कोरोनाच्या स्थितीबद्दल प्रामुख्याने चर्चा झाली. विशेषतः 25 जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे. त्या जिल्ह्यातील सर्व निर्बंध शिथील करण्याबाबत गांभीर्याने विचारविनिमय करण्यात आला. त्यासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एक दोन दिवसात शिफारस करण्याचाही निर्णय करण्यात आला. त्यानंतरच या 25 जिल्ह्यात सर्व निर्बंध हटविले जातील, अशी चिन्हे आहेत.

राज्यातील 11 जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती अजून निवळलेली नाही. त्यात पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगट, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, पालघर, नगर तसेच मराठवाड्यातील बीड जिल्ह्याचा समावेश असल्याची माहिती हाती आली आहे. हे आकरा जिल्हे लेवल-3 मध्येच राहतील. दरम्यान, या संदर्भात येत्या दोन दिवसात निर्णय अपेक्षित आहे.






Post a Comment

0 Comments