Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

कॅनॉलवर बेकायदेशीररित्या पुल बांधण्याची परवानगी देणाऱ्या कार्यकारी अभियंताची चौकशी करण्याचे आदेश





परभणी ➡️ शहरातील कॅनॉलवर बेकायदेशीररित्या पुल बांधण्याची परवानगी देणाऱ्या कार्यकारी अभियंता यांच्या चौकशीचे करण्याची मागणी निवेदन 26 जुलै रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चभाऊ कडु यांना दिले होते. त्यांनी तीन दिवसांत यांची दखल घेत 29 जुलै रोजी प्रधान सचिव जलसंपदा व लाभक्षेत्र विकास यांना कॅनॉलवर बेकायदेशीररित्या पुल बांधण्याची परवानगी देणाऱ्या राजेश सलगरकर, कार्यकारी अभियंता जायकवाडी विभाग क्र. 02 यांची चौकशीचे आदेश आहे.

परभणी शहरात दि . 11 जुलै 2021 रोजी परभणी मध्ये झालेल्या अतिवृष्टित परभणी शहरातील कॅनॉललगत असलेल्या अवका नगर, संतसेना नगर, विश्वास नगर, गुलजार कॉलनी व सरगम कॉलनी या भागामध्ये नागरीकांच्या घरामध्ये मोठया प्रमाणावर पाणी शिरल्याने जनतेचे मोठे आर्थिक नुकसान झाले व जिल्हा प्रशासनाला त्यांना स्थलांतरीत करण्याची वेळ आली होती. योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे परिस्थिती हाताबाहेर न जाता जिवित हानी होता-होता वाचली यासाठी संपूर्णतः जवाबदार असलेला या कॅनॉलवर महानगरपालिकेमार्फत बांधण्यात येणारा पुल आहे.

या पुलाच्या बांधकामासाठी तत्कालीन कार्यकारी अभियंता जायकवाडी विभाग क्र. 02 श्री. राजेश सलगरकर यांनी नियमांची पायमल्ली करीत कुठलाही अधिकार नसतांनाही बेकायदेशीररित्या या पुल कामासाठी परभणी शहर महानगरपालिकेला ना हरकत प्रमाणपत्र दिले, याच ना हरकत प्रमाणपत्रावर या पुलाचे बांधकाम महानगरपालिकेने सुरु केले. हे नाहरकत प्रमाणपत्र देताना सलगरकर यांनी कनॉलवरील पूल बांधकामाच्या नियमावलीचे व शासन आदेशाचे उल्लंघन केले आहे. 

मुळात जलसंपदा विभागाच्या कुठल्याही पुलावर बांधकाम करायचे असेल तर त्या पुलामुळे कॅनॉलमध्ये वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा वर निर्माण होणाऱ्या अडचळयांचा तसेच पुलाच्या डिझाईनचा अभ्यास करुन जायमोक्यावर जाऊन स्थळपाहणी करुन जलसंपदा विभागाच्या वतीने अहवाल तयार करुन तो अहवाल, कामाची इस्टीमेंट व प्रस्तावित पुलाचे डिझाईन मुख्य प्रशासक व मुख्य अभियंता लाभक्षेत्र विकास प्राधिकरण औरंगाबाद यांच्याकडे सादर करुन त्यांच्या मार्फत ते मान्य झाल्यावरच यांच्या मार्फतच पुल बांधकामसाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले जाते. परंतु या प्रकरणामध्ये अशा कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. राजेश सल्नगरकर यांनी अधिकार नसतानाही स्वतः च या पुल बांधकामाचे ना हरकत प्रमाणपत्र महानगरपालिकला दिले. या पुल बांधकामाच्या कामामुळेच कॅनॉलमध्ये अडथळा निर्माण होऊन पुर परिस्थिती निर्माण झाली होती.

या बाबत प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, युवा तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, युवा उपशहर प्रमुख पिट् कदम, प्रसिध्दी प्रमुख नकुल होगे यांनी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास विभागाचे राज्यमंत्री मा. ना. बच्चुभाऊ कडु यांच्याकडे दि. 26 जुलै 2021 रोजी या प्रकरणाची चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्याची अशी निवेदनाद्वारे विनंती केली होती. 

या निवेदनानुसार मा.ना. बच्चुभाऊ कडु, राज्यमंत्री जलसंपदा व लाभक्षेत्र विकास यांनी मा. प्रधान सचिव जलसंपदा व लाभक्षेत्र विकास यांना श्री. राजेश सनगरकर यांनी अधिकार नसतांनाही परभणी महानगरपालिकेला कॅनॉलवर पुल बांधकामासाठी अनाधिकृतपणे दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्राची व बांधकाम परवानगीची चौकशी करुन त्वरीत अहवाल सादर करण्याचे आदेश दि. 29 जुलै 2021 रोजी दिले आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाने केलेल्या तक्रारीला यश मिळाले असून यामुळे जायकवाडी विभागात होत असलेल्या चुकीच्या कामाला चाप बसणार असून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही पण होणार आहे.




Post a Comment

0 Comments