Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

पूर्णा ते नांदेड या रस्त्यावर नर्‍हापूरजवळ जीप अपघातात 10 व्यक्ती जखमी, जीप चालक गंभीर





परभणी ➡️ पूर्णा ते नांदेड या रस्त्यावर नर्‍हापूर गावाजवळ भरधाव जाणार्‍या क्रुझर या जीपगाडीचे मागचे टायर फुटून क्रुझर पलटी झाल्याने दहा व्यक्ती जखमी झाल्या. त्यातील जीप चालकाची प्रकृती गंभीर आहे.



या बाबत अधिक माहिती अशी की, हिंगोली जिल्ह्यातील हट्टा येथील खाडे परिवारामधील विशाल खाडे या तरुणाचा नांदेड येथे साखरपुड्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी खाडे कुटूंबीय एम.एच. 38 व्हि. 0978 या वाहनाने नांदेडला जात होते. दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास पूर्णा तालुक्‍यातील नर्‍हापुर गावाजवळ मरथाव क्रुझर गाडीच्या मागील बाजूचे टायर फुटले.

त्यानंतर वाहनाने तीन पलट्या खाल्ल्या. अपघातात जीपचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरातील अपघातस्थळी वाहनधारक तात्काळ धावून आले. यात विशाल गणेश खाडे, मिलिंद मरीबा खाडे, संतोष नागोराव खाडे, सुदाम खोब्राजी खाडे, अरुष रवि खाडे, निकितरमेश खाडे, ऋतिक सुभाष खाडे (सर्व रा. हट्टा), मिकाजी शंकर पुंडगे जखमींना पूर्णा येथील रुग्णालयात दाखल केले. तर गंभीर जखमी असणार्‍या वाहन चालक राहूल खाडे याला प्रत्यक्षदर्शनींनी उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात हलविले. 







Post a Comment

0 Comments