Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

पर्यावरण मंत्री आदित्य साहेब ठाकरे यांच्याहस्ते किटचे वाटप; कोकणवासीयांनी मानले आ. डॉ. राहुल पाटील यांचे आभार




परभणी ➡️ युवासेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी तसेच त्या ठिकाणची परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी परभणी शिवसेना व माझ्यावतीने कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी पाठविलेल्या 5 हजार मदत किटचे मा. आदित्य साहेब यांच्याहस्ते प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले.

सुमारे 500 ते 600 किलोमीटर दूर असलेल्या परभणीहून पूरग्रस्तांसाठी आलेली ही मदत अत्यंत मोलाची आहे. महाराष्ट्र शासन पूरग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत देत आहे. परंतु ही अतिरिक्त मदत देखील उपयुक्त आहे. शिवसेना नेहमीच आपत्तीग्रस्त आणि संकटात असलेल्या नागरिकांसाठी धावून जाते, असे आदित्य साहेब ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसैनिकांच्या या कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या तसेच समाधान देखील व्यक्त केले.

यासह महाडचे शिवसेना आमदार भरतसेठ गोगावले आणि रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शहरी व ग्रामीण भागात घरोघरी जावून या अन्नधान्यकिटचे वितरण करण्यात आले.

परभणी येथून शिवसेनेचे उपशहरप्रमुख संभानाथ काळे, मारुती तिथे, बाबू फुलपगार, नाना येवले व माझे इतर सहकारी कोकण व पश्चिम महाराष्ट्रात मदत किट वितरित करण्याचे कार्य करीत आहेत.




Post a Comment

0 Comments