Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

गुंजेगाव येथील रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिराला उदंड प्रतिसाद






परभणी ➡️ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त गुंजेगाव येथे राष्ट्रवादी   युवक काँग्रेस गंगाखेड विधानसभेच्या वतीने 51 जणांनी रक्तदान व 151 जणांनी आरोग्य तपासणी केली. या शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. गंगाखेड तालुक्यातील गुंजेगाव येथे सकाळी 11 वाजता शिबिराचे उद्घाटन हभप माऊली महाराज मुडेकर यांच्या हस्ते  झाले. 



या वेळी राँका ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मायंदळे, गंगाखेड विधानसभा अध्यक्ष कृष्णाभैया दळणर, गुंजेगावचे सरपंच सायस इमडे, तुषार गोळेगावकर, उपसरपंच मोटे,वैद्यकीय अधिकारी माने, डॉ.एपर आदींची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या  प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांची भाषणे झाली. हा कार्यक्रम शासनाच्या नियमानुसार करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला.






Post a Comment

0 Comments