Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

प्रकाश घोडके यांचा सेवागौरव समारंभ संपन्न





सेलू ➡️ येथील नूतन महाविद्यालयातील प्रा प्रकाश घोडके यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम  सोमवार ( दि. 31  ) रोजी आयोजित केला. यानिमित्ताने महाविद्यालयात कोरोना- 19 चे नियम पाळून आयोजित केलेल्या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलतांना डॉ. एस. एम. लोया  म्हणाले की, सेवा आणि समर्पण यामुळेच 'नूतन' उभी आहे घोडके यांची सेवा महाविद्यालयाच्या विकासासाठी सहाययभूत ठरली. पूर्ण समर्पणाने त्यांनी आपली सेवा दिली त्यामुळे उर्वरित आयुष्य त्यांचे नक्कीच आनंदात जाईल." असे त्यांनी प्रतिपादन केले.

या कार्यक्रमात नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या वतीने प्रकाश घोडके यांना स्मृतिचिन्ह शॉल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मंचावर प्राचार्य डॉ शरद कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ महेंद्र शिंदे आणि डॉ उत्तम राठोड, प्रा. सुभाष बिरादार, प्रा प्रकाश घोडके, दत्तात्रय रोकडे, कार्यालयीन अधीक्षक उषा कदम , विठ्ठल वाघमारे यांची उपस्थिती होती. 

यावेळी प्रा ए. डी. कुलकर्णी, प्रा विश्वास वसेकर, प्रा सुभाष बिरादार,प्रा संजय पिंपळगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी डी एन गायकवाड, डी.बी गायकवाड , प्रा मनोज काटकर, प्रा शफी कुरेशी,  प्रा आसाराम मदने, विलास साळवे यांनी प्रकाश घोडके यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.दयानंद जामगे यांनी केले. तर आभार  दीपाली शेरे यांनी मानले.




Post a Comment

0 Comments