Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

खंडोबा मंदिराच्या सुशोभिकरण कामाचे भूमीपूजनाचे, 60 लाखाचा निधी जाहीर





परभणी ➡️ येथील खंडोबा बाजारातील पुरातनकालीन खंडोबा बाजारच्या सुशोभिकरण कामाचेे भूूूूूूूमीपूजन आज आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 

जिल्ह्यातील धनगर समाजाच्या वतीने मारोती बनसोडे व अरविंद देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने आमदार पाटील यांना एक निवेदन सादर केले होते. त्या अनुषंगाने डॉ. पाटील यांनी स्वतःच्या स्थानिक विकास निधीतून पेवर ब्लॉक, समाजमंदिर सभागृह, मंगल कार्याला, प्रवेशद्वार उभारणीस 60 लाख रुपयांचा निधी जाहीर केला आहे.


पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोमवारी (दि.31) विकास कामांचे भूमीपूजन आमदार पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख डॉ. विवेक नावंदर, मारोती बनसोडे, रामजी तळेकर, अरविंद देशमुख, नगरसेवक सुनील देशमुख, अनंत बनसोडे, किशोर रणेर, मारोती तिथे, गणेशराव मिरासे, सचिन गारुडी, एकनाथ पराडकर, सुरेश चांदणे, बाळू गवळे, लक्ष्मण बोबडे, शुभम नवघरे, संजय वाळवंटे, अशोक मुळे, विठ्ठल काळे, रणजित बनसोडे, गणेश मुळे, प्रमोद गिराम, सतीश गंगावणे आदी उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments