Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणी जिल्ह्यातील लॉकडाऊनात 16 जूनपर्यंत वाढ, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांचे आदेश





परभणी
➡️ जिल्ह्यात किराणा, भाजीपाला, फळ विक्री व वैद्यकीय सेवांव्यतिरिक्त असणार्‍या व्यापारी आस्थापना व इतर व्यवहारांवर जिल्हा प्रशासनाने दिनांक 1 ते 16 जूनपर्यंत निर्बंध कायम ठेवण्याचे आदेश आज काढले आहेत. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी याबाबत चे आदेश आज सोमवारी सायंकाळी जारी केले आहेत.

ज्याअर्थी, कोविड-19 विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने आपत्कालीन उपाय योजनेचा भाग म्हणून या कार्यालयाचे आदेशान्वये परभणी जिल्ह्यात दि. 31 मे, 2021 पर्यंत लॉकडाऊन (संचारबंदी) आदेश लागू करण्यात आले आहेत. परंतू राज्यातील करोना संसर्ग अद्यापही कमी झाला नाही. राज्यातील करोना परिस्थिती पाहता जिल्ह्यात लॉकडाऊन कालावधी मध्ये दि. 15.06.2021 रोजीचे सकाळी 07.00 वाजे पर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील करोना संसर्ग अद्याप कमी झाला नसल्याने शासनाचे आदेशानुसार जिल्ह्यातील लॉकडाऊन (संचारबंदी) कालावधी वाढविण्यात आला आहे.

म्हणूनच जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपती व्यवस्थापन प्राधिकरण दी.म.मुगळीकर करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून साथरोग प्रतिबंध कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावली मधील तरतुदीनुसार आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या अधिन राहून मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार परभणी जिल्हयात कोविड-19 संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखणेसाठी लॉकडाऊन (संचारबंदी) कालावधी दिनांक, 01 जून, 2021 रोजीचे सकाळी 07.00 वा. पासून ते दिनांक 16 जून, 2021 रोजीचे सकाळी 07.00 वा. पर्यंत वाढविण्यात येत आहे.

तसेच कार्यालयाचे आदेश दि.14.04.2021 रोजीचे आदेशान्वये ज्या आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक बाबी यांना या कार्यालयाने सूट दिल्रेली आहे किंवा निर्बंध घालण्यात आले आहेत, त्यात खालीलप्रमाणे बदल करण्यात येत आहेत.

1) जिल्हयातील सूट दिलेल्या किराणा, भाजीपात्रा व फळविक्री सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते दुपारी 02.00 वाजेपर्यंत चालू राहतील (शनिवार व रविवार बंद राहीतील)

2) जिल्ह्यातील बँका मधीन 80 व 05) सेवा व ग्राहकांसाठी बँका बँकेच्या नेहमीच्या वेळेनुसार चानू राहतील.

3) जिल्हयातील केवळ कृषि निविष्ठा, रासायनिक खते, औषधे, बि बियाणे, शेती औजारे व शेतीशी निगडीत आस्थापना, दुकाने, गोदामे तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती व अडत बाजार, मार्केट कमीटया यांना आठवड्याचे सर्व दिवस सकाळी 07.00 ते सायंकाळी 05.00 वाजे पर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात येत आहे.

4) कोरोना विषयक वैद्यकीय सेवा व सहाय्यभुत सेवा देणा-या आस्थापना आठवड्याचे सर्व दिवस पूर्ण वेळ चालू राहतील. तसेच खात्रील आस्थापना चालू राहिल.

5) सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालय त्यांचे अधिकारी/ कर्मचारी/त्यांची वाहने/सर्व शासकीय वाहने.

6) अत्यावश्यक सेवेतील वाहने व व्यक्‍ती.

7) प्रिंट मिडीया/इलेक्ट्रीक मिडीया यांचे संपादक, वार्ताहर, प्रतिनीधी, वितरक इ.

8) पेट्रोलपंप व गॅस वितरक, कर्मचारी व त्यांची वाहने.

9) कोरोना लसीकरण केलेल्या व्यक्‍ती व लसीकरणासाठी जाणा-या व्यक्‍ती यांना सूट राहीन.

10) आरटीपीसीआर / अन्टीजन चाचणी करण्यासाठी जाणा-या व्यक्‍ती यांना सूट राहीन.

11) स्वस्त धान्य दुकाने (शक्‍यतो घरपोच धान्य देण्याचा प्रयत्न करावा)

12) घरपोच पिण्याचे पाणी पुरवठा करणारी वाहने.

13)  ई- कॉमर्स सेवा सूरु राहतील.

14) औद्योगीक कारखाण्यात काम करणारे कामगार यांना सूट राहील.

15) दुध विक्रेते यांना फिरुन विक्री साठी सकाळी 06.00 ते 09.00 वाजे पर्यंत तर दुध डेअरी धारकांना सकाळी 7.00 ते संध्याकाळी 08.00 या कालावधीत आठवडयाचे सर्व दिवस दुध विक्रीस परवानगी असेन.

सदर आदेशाची अमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकरी, जि.प.परभणी, पोलीस अधिक्षक, परभणी, जिल्हा कृषि अधिक्षक, परभणी, अयुक्त, परभणी शहर महानगरपालीका परभणी व मुख्याधिकारी, सर्व नगर परीषद/नगर पंचायत यांचेवर राहील.












Post a Comment

0 Comments