Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

आईचा सांभाळ करण्यास नकार देणाऱ्या पांच मुलांवर गुन्हा दाखल





भोपाळ ➡️ मुले  म्हतारपणाची काठी असतात हा विश्वास आज प्रत्येक आई-वडिलांमध्ये आहे. ती वृद्धापकाळातील आधार मानले जातात. मात्र, आज मुलांना आई-वडील ओझे वाटू लागले आहेत. वृद्ध आई-वडलांचा सांभाळ करण्यास अनेक मुले तयार नसतात. असाच एक धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशमध्ये समोर आला आहे. 05 मुले असूनही एका वृद्ध आईवर दारोदारी भटकण्याची वेळ आली आहे. लहानाचे मोठे केलेल्या पाचही मुलांनी वृद्धापकाळात आधार देण्यास नकार दिला. अखेर या वृद्ध आईला अखेरीस पोलीस ठाणे गाठावे लागले. 

मध्य प्रदेशमधील राजागड येथील देवाखेडी गावातील रहिवासी असलेल्या रामकुंवर बाई ह्या पतीच्या निधनानंतर एकट्याच राहत आहेत. त्यांचे 05 मुले आहेत. मात्र त्यांचे विवाह झाल्यानंतर हे पाचही मुले त्यांच्या त्यांच्या पत्नींसह वेगळे राहू लागले. मात्र एकट्या राहिलेल्या वृद्ध आईचा सांभाळ करण्यासाठी कुणीही पुढे येईना. अखेर मदतीसाठी लाचार झालेल्या या वृद्ध मातेने मदतीसाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर एसपी प्रदीप शर्मा यांनी या प्रकरणाची दखल घेत पोलिसांच्या माध्यमातून पाचही मुलांना समज दिली.

दरम्यान, तरीही वृद्ध आईला आधार देण्यास पाच मुलांमधील कुणीही तयार होईनात. अखेरीस पोलिसांनी पाचही मुलांविरोधात ज्येष्ठ नागरिक देखभाल अधिनियम 24 अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर पाचपैकी राजेंद्र सिंह, हिंमत सिंह, आणि रमेश सिंह या तीन मुलांवर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. अन्य दोन मुलांनाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.




Post a Comment

0 Comments