Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

कोरोना होऊन गेलेल्या नागरिकांनी योगा व प्राणायाम चा अवलंब करा- योगशिक्षक गजानन चौधरी





जिंतूर ➡️ कोरोना होऊन गेल्यानंतर शरीरावर दुष्परिणाम होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. याकरिता शरीरातील मुख्य अवयवांचे आरोग्य सुव्यवस्थित ठेवणे गरजेचे बनले आहे. यासाठी नागरिकांनी दैनंदिन जीवनात प्राणायाम चा अवलंब केला पाहिजे, असे प्रतिपादन योगशिक्षक गजानन चौधरी यांनी कौसडी येथील कार्यक्रमात व्यक्त केले.




जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दिनांक 29 मे रोजी 05 दिवसीय योगा व प्राणायाम शिबिराचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित योग साधकांना मार्गदर्शन करताना योगशिक्षक गजानन चौधरी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य प्रशासक व्ही.एस. ढोणे होते. याप्रसंगी ग्रामसेवक अनिल खराबे, डॉ. किरण बकान, एस.टी. मोरे, बी.टी. मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

शिबिराच्या पहिल्या दिवशी योगशिक्षक गजानन चौधरी व डॉ. किरण बकान यांनी प्राणायाम व यौगिक क्रिया यांचे प्रात्यक्षिक करून उपस्थित नागरिकांना रीतसर मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेख निईमोद्दीन, भगवान खैरे, शेख अस्लम, अक्षय सोनवणे, जफरखान पठाण, सुरेश खैरे, बाळासाहेब मोरे, शेख रईस, गणेश देशमुख, हनुमान शिंपले यांनी परिश्रम घेतले.


*चौकट* 

*ग्रामस्थांकडून तरुणांचे कौतुक* 

गावातील शेख नईमोद्दीन, भगवान खैरे, शेख असलम, अक्षय सोनवणे, गणेश देशमुख हे तरुण योगा व प्राणायाम शिबिराचे सुव्यवस्थित नियोजन करत आहेत. यामुळे गावातील सुजाण नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे. 


*फोटो ओळी* 

*बोरी-* येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रांगणात मोफत योगा व प्राणायाम शिबिरास प्रारंभ झाला. याप्रसंगी योगशिक्षक गजानन चौधरी, डॉ. किरण बकान व नागरिक दिसत आहेत.




Post a Comment

0 Comments