Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

मोदी सरकारविरोधात काँग्रेसची परभणीत जोरदार निदर्शने!





परभणी
➡️ 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या सात वर्षातील निष्क्रिय कारभारांच्या निषेधार्थ स्थानिक काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी  रविवारी (ता.30) परभणीत जोरदार निदर्शने केली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ कार्यकर्त्यांनी सकाळी 11 वाजता मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, श्रीधरराव देशमुख,बाळासाहेब फुलारी, महापौर अनिता सोनकांबळे,रवी सोनकांबळे, बाळासाहेब देशमुख,तुकाराम साठे, खदिरला हाश्मी, सुहास पंडित, खरवडे-वांगीकर व जाहगिरदार सुरेश देसाई, अभय देशमुख, अकबर जहागीरदार, अब्दुल सईद अहेमद, सणीम तांबोळी, मातींन शेख, दिगंबर भोसले,सत्तार पटेल,आर.एस देशमुख, नागसेन भेरजे हे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.मोंढा पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार टिका टिप्पणी केली. मोदी सरकारच्या कारभाराने देश 25 वर्षे अधोगतीकडे गेला असून त्याचे गंभीर परिणाम देशातील जनतेला भोगावे लागत आहेत. मागील सात वर्षांत मोदींनी विकासाच्या नावाखाली देश भकास करुन टाकला आहे. काँग्रेसच्या सरकारने 70 वर्षात देशाला समृद्ध, स्वाभिमानी राष्ट्र म्हणून जगात ताठमानेने उभे केले त्याची पुरती वाताहात लावून देश रसातळाला नेला.  अशी टिका केली.मोदींच्या सात वर्षाला दोन कोटी रोजगार, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, काळा पैसा भारतात आणणार, 100 दिवसात महागाई कमी करणार, ‘ना खाऊंगा ना खाणे दूँगा’ म्हणत देशाची ‘चौकीदारी’ करण्याची भलीमोठी आश्वासने देण्यात आली.नरेंद्र मोदी सत्तेवर आले पण सात वर्षानंतरही मोदींनी दिलेल्या आश्वासनातील एकही ते पूर्ण करु शकले नाहीत. सात वर्षात महागाई एवढी वाढली की लोकांचे जगणे मुश्कील झाले, नोटाबंदीने देशातील छोटे, मध्यम, लघु उद्योग बंद पडले, बेरोजगारी प्रचंड वाढली. काळे कायदे आणून शेतकरी व कामगार देशोधडीला लावले. बँका, रेल्वे, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या उद्योगपती मित्रांना विकल्या, समाजा-समाजात भांडणे लावण्याचे उद्योग केले. मोदींच्या राज्यात समाजातील एकही घटक समाधानी नाही. असे एका निवेदनातून म्हटले आहे.




Post a Comment

0 Comments