Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणीत लसीकरणासाठी आता 12 केंद्र , सोमवारी लसीकरण सुरु





परभणी
➡️ परभणी महापालीकेच्या वतीने शहरात सोमवार (दि.31) पासून एकुण 12 केंद्रावर लसीकरण होणार आहे.आता नव्याने 3 केंद्र वाढविण्यात आली आहे. आज कोवीशिल्ड ही लस 45 वर्षापुढील नागरीकांना दिली जाणार आहे, अशी माहीती महापालीका आयुक्त देविदास पवार यांनी दिली आहे

परभणी शहरात महापालीकेच्या वतीने सध्या शहरात महापालीकेच्या इनायत नगर, नागरी प्राथमीक आरोग्य केंद्र,  साखला प्लॉट, नागरी प्राथमीक आरोग्य केंद्र, वर्मा नगर, नागरी प्राथमीक आरोग्य केंद्र,दर्गा रोड, नागरी प्राथमीक आरोग्य केंद्र,जायकवाडी रुग्णालय, शंकर नगर, नागरी प्राथमीक आरोग्य केंद्र, खंडोबा बाजार, नागरी प्राथमीक आरोग्य केंद्र, खानापूर, नागरी प्राथमीक आरोग्य केंद्र, बाल विद्यांमदीर हायस्कुल, नानल पेठ परभणी येथील लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरु आहे.आता त्यात आणखी 3 केंद्राची भर पडली आहे. गर्दी कमी करण्यासाठी आणि नागरीकांची सोय व्हावी म्हणून पालीकेने तीन केंद्र वाढवले आहेत. त्यात कौसर हॉस्पीटल, अपना कॉर्नर, हयात हॉस्पीटल गव्हाणे रोड,करीम हॉस्पीटल जिल्हा शासकीय रुग्णालय रोड हे केंद्र आहेत..




Post a Comment

0 Comments