Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

✴ परभणी जिल्ह्यात एक ते चार मे पर्यंत किराणा, भाजी व फळ विक्रेता यांची दुकान राहतील खुले






मात्र परभणी जिल्ह्यात संचारबंदी राहणार 15 मे पर्यंत कायम

परभणी ➡️ जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने 15 मे पर्यंत सर्व निर्बंध लागू राहतील असे आदेश 30 एप्रिल रोजी जारी केले आहेत. 17 एप्रिलपासून जिल्हा प्रशासनकडून किराना दुकान, भाजी व फळविक्रेतांना आपल्या व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर तब्बल 13 दिवसांनी जिल्हा प्रशासन कडून ही बंदी उठविली आहे. आजच्या आदेशात  सर्व आस्थापना व दुकाने 15 मे पर्यंत पूर्णतः बंद राहतील असेही या आदेशाद्वारे स्पष्ट केले आहे. त्यात अत्यावश्यकबाबीतील वैद्यकीय सुविधा त्यात हॉस्पिटल्स आणि औषधी दुकाने यांना सुट राहणार आहे. तसेच 1 ते 4 मे पर्यंत किराणा, भाजी व फळ विक्रेत्यांना लॉकडाऊनच्या दरम्यान सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंत सामाजिक आंतर राखून आणि कोरोना संबंधित  सर्व नियमांचे पालन करून दुकानदाराला माल विक्रीसाठी विशेषतः हातगाड्यावर परवानगी दिली आहे.



Post a Comment

0 Comments