Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

✴ नांदेड, चंद्रपूर, परभणी आणि अकोला जिल्ह्यातील शुक्रवाराचा कोरोना रिपोर्ट






नांदेड जिल्ह्यात 665 व्यक्ती कोरोना बाधित,21 जणांचा मागील 03 दिवसांत मृत्यू


नांदेड ➡️ जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 3 हजार 19 अहवालापैकी 665 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 520  तर अँटिजेन तपासणीद्वारे 145 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 80  हजार 182 एवढी झाली असून यातील 67  हजार  611  रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला  10  हजार  757 रुग्ण उपचार घेत असून 181 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 दिनांक 28 ते 30 एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत 21 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 552 एवढी झाली आहे. दिनांक 28 एप्रिल रोजी हदगाव कोविड रुग्णालय येथे हदगाव तालुक्यातील पिंगळी येथील 80 वर्षाची महिला, किनवट कोविड रुग्णालय येथे किनवट तालुक्यातील बोधडी येथील 85 वर्षाचा पुरुष दिनांक 29 एप्रिल रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे किनवट येथील 85 वर्षाचा पुरुष, धर्माबाद येथील 63 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे मुदखेड तालुक्यातील पिंपळकौठा येथील 55 वर्षाचा पुरुष, उमरी येथील 70 वर्षाचा पुरुष, शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालय येथे अर्धापूर तालुक्यातील देलूब येथ्ज्ञील 71 वर्षाचा पुरुष, अपेक्षा रुग्णालय येथे आर्शीवाद नगर नांदेड येथील 80 वर्षाची महिला, श्री गणेशा रुग्णालय येथे पटेल कॉलोनी नांदेड येथील 63 वर्षाची महिला, गोदावरी रुग्णालय येथे येथे तुप्पा नांदेड येथील 26 वर्षाचा पुरुष, नारायणा रुग्णालय येथे करीमलकापूर तालुका देगलूर येथील 75 वर्षाचा पुरुष, व्हिजन रुग्णालय येथे पांडुरंगनगर नांदेड येथील 34 वर्षाचा पुरुष, लोटस रुग्णालय येथे अश्रु नगर नांदेड येथील 50 वर्षाचा पुरुष, दि. 30 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे हदगाव तालुक्यातील तामसा येथील 70 वषाचा पुरुष, तृप्ती नगर नांदेड येथील 37 वर्षाचा पुरुष, देगलूर तालुक्यातील तमलूर येथील 45 वर्षाचा पुरुष, कंधार येथील 48 वर्षाचा पुरुष, कंधार येथील 55 वर्षाचा पुरुष, हदगाव तालुक्यातील तळेगाव येथील 52 वर्षाचा पुरुष, शक्ती नगर नांदेड येथील 65 वर्षाची महिला, हदगाव येथील 55 वर्षाची महिला यांचा समावेश आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.32 टक्के आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 210, बिलोली 7, हिमायतनगर 8,माहूर 23,उमरी 5, लातूर 2,  नांदेड ग्रामीण 8, देगलूर 52, कंधार 39, मुदखेड 26, परभणी 6, वाशिम 2, मुखेड 39, यवतमाळ 2, नायगाव 3, हिंगोली 8 असे एकूण 520 बाधित आढळले.

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे मनपा क्षेत्रात 30, बिलोली 1, माहूर 8, मुखेड 20, नांदेड ग्रामीण 2, देगलूर 17, मुदखेड 2, नायगाव 5, अर्धापूर 10, धर्माबाद 6, किनवट 26,  हिंगोली 6, भोकर 2, हदगाव 5, लोहा 4, परभणी 1 व्यक्ती असे एकूण अँन्टिजेन तपासणीद्वारे 145 बाधित आढळले.

आज जिल्ह्यातील 1 हजार 304 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 16, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण 696, धमार्बाद तालुक्यातंर्गत 9, देगलूर कोविड रुग्णालय 19, अर्धापूर तालुक्यातंर्गत 12, उमरी तालुक्यातंर्गत 52, मालेगाव टीसीयु कोविड रुग्णालय 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 28, मुखेड कोविड रुग्णालय 64, मुदखेड कोविड केअर सेंटर 11, किनवट कोविड रुगणालय 45, हिमायतनगर तालुक्यातर्गत 38, बिलोली तालुक्यातंर्गत 44, किनवट कोविड रुग्णालय 23, हिमायतनगर तालुक्यातंर्गत 38, नायगाव तालुक्यातर्गत 6, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 7, हदगाव कोविड रुग्णालय 21, कंधार तालुक्यातंर्गत 43, माहूर तालुक्यातंर्गत 20, लोहा तालुक्यातंर्गत 62, खाजगी रुग्णालय 116 बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली .   

आज 11 हजार 757 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय 180जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 88जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ( नवी इमारत) 167शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 85, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 114, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 94, देगलूर कोविड रुग्णालय 37, जैनब कोविड हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 39, बिलोली कोविड केअर सेंटर 72, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 4, नायगाव कोविड केअर सेंटर 31उमरी कोविड केअर सेंटर 29माहूर कोविड केअर सेंटर 18भोकर कोविड केअर सेंटर 5हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 63, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 51, कंधार कोविड केअर सेंटर 14, धर्माबाद कोविड केअर सेंटर 66 , मुदखेड कोविड केअर सेंटर 17, अर्धापूर कोविड केअर सेंटर 18, बारड कोविड केअर सेंटर 10, मांडवी कोविड केअर सेंटर 5, मालेगाव टिसीयु कोविड रुग्णालय 4, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 39एनआरआय कोविड केअर सेंटर 55पंजाब भवन कोविड केअर सेंटर 33 ,  नांदेड मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 4 हजार 608, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 2 हजार 914, खाजगी रुग्णालय 1 हजार 896, हैद्राबाद येथे संदर्भित 1 असे एकूण 10 हजार 757 उपचार घेत आहेत. 


चंद्रपूर  जिल्ह्यात 1 हजार 667 पॉझिटिव्ह, तर 28 मृत्यू

चंद्रपूर ➡️ जिल्ह्यात मागील 24 तासात 1415 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1667 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 28 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 60 हजार 312 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 42 हजार 823  झाली आहे. सध्या 16 हजार 584  बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 76 हजार 722 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 11 हजार 662 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील रामनगर येथील 70 वर्षीय महिला व 74 वर्षीय पुरुष, छत्रपती नगर येथील 49 वर्षीय पुरुष, 37 व 61 वर्षीय पुरुष, विश्वकर्मा नगर येथील 52 वर्षीय महिला, म्हाडा कॉलनी परिसरातील 62 व 72 वर्षीय पुरुष, रयतवारी कॉलनी परिसरातील 43 वर्षीय पुरुष, इंदिरा नगर येथील 27 वर्षीय पुरुष, दुर्गापूर येथील 55 वर्षीय पुरुष, बाबुपेठ येथील 62 वर्षीय महिला, बोर्डा चंद्रपूर येथील 70 वर्षीय महिला,  भिवापूर येथील 78 वर्षीय पुरुष. वरोरा तालुक्यातील 62 वर्षीय पुरुष, जिवती तालुक्यातील 63 वर्षीय पुरुष, चिमूर तालुक्यातील 48 वर्षीय पुरुष, खापरी येथील 76 वर्षीय महिला, मासळ येथील 50 वर्षीय पुरुष. नागभीड तालुक्यातील 50 वर्षीय पुरुष, तळोधी येथील 65 वर्षीय पुरुष, गडचांदूर येथील 58 वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी तालुक्यातील विद्या नगर येथील 75 वर्षीय महिला, राजुरा तालुक्यातील 55 वर्षीय पुरुष, यवतमाळ येथील 75 वर्षीय पुरुष व  65 वर्षीय महिला, भंडारा येथील 58 वर्षीय महिला, सावर्ला-पवनी येथील 40 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 905 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 836, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 27, यवतमाळ 27, भंडारा नऊ, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे. आज बाधीत आलेल्या 1667 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 381, चंद्रपूर तालुका 81, बल्लारपूर 119, भद्रावती 177, ब्रम्हपुरी 69, नागभिड 88, सिंदेवाही 57, मूल 58, सावली 26, पोंभूर्णा 19, गोंडपिपरी 49, राजूरा 107, चिमूर 60, वरोरा 205, कोरपना 142,  जिवती 11 व इतर ठिकाणच्या 18 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.


जिल्ह्यात 8 हजार 184 रुग्णांवर उपचार सुरू, 928 रुग्णांची वाढ

परभणी ➡️ जिल्ह्यातील 928 रुग्णांचे अहवाल शुक्रवार दि.30 एप्रिल 2021 रोजी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 36363 एवढी झाली आहे. त्यापैकी  27290 बरे झाले तर 889 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 8184 जणांवर उपचार सुरु असून आज एकुण 573 कोरोनाबाधितांना रुग्णालयातून सूट्टी देण्यात आली आहे. तसेच आज 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकुण 8  हजार 515 बेड उपलब्ध असून ॲक्टीव्ह बेड 8 हजार 184 तर व्हॅकन्ट बेड 331 आहेत. असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.


रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 1334 चाचण्यात 201 पॉझिटीव्ह

अकोला ➡️ कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.29) दिवसभरात झालेल्या 1334 चाचण्या झाल्या त्यात 201 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

काल दिवसभरात अकोट येथे 13 चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, बाळापूर येथे 16 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, बार्शीटाकळी येथे 69 चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, पातूर येथे 29 चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तेल्हारा येथे 65 चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, मुर्तिजापूर येथे 138 चाचण्या झाल्या त्यात 35 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर अकोला महानगरपालिका येथे 726 चाचण्या झाल्या त्यात 53 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अकोला आयएमए येथे 23 चाचण्या झाल्या त्यात तिघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 98 चाचण्या झाल्या त्यात 26 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर हेडगेवार लॅब येथे 140 चाचण्या झाल्या त्यात 65 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर अकोला येथे एक व जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांचे 16 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 1334 जणांच्या चाचण्या होऊन त्यात 201 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात 1 लक्ष 7 हजार 287 चाचण्या झाल्या पैकी 8766 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.




Post a Comment

0 Comments