Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

✴ परभणी शहरातील 83 वर्षाच्या आजीने होम आयसोलेशन मध्ये राहून केली कोरोनावर मात






परभणी ➡️  कोरोना मुळे सर्व जग संकटातअसताना आणि सर्व प्रकारच्या चिकित्सा कोरोनाशी लढा देत आहेत अशा स्थितीत आता होमिओपॅथीक उपचार पद्धती कोरोना वर यशस्वी ठरू लागल्याने मोठा रामबाण उपाय सापडला आहे, परभणीत 83 आजीबाईनी होमिओपॅथिक उपचार पद्धती अवलंब करत कोरोना वर यशस्वी मात करत कोरोनाला घाबरून जाणाऱ्यायांना एक चांगला संदेश दिला आहे.


आता रुग्ण होमिओपॅथिक मुळे देखील ठणठणीत बरे होत असल्याने आता न घाबरता रुग्णांनी कमी खर्चातील या चिकित्सा पद्धतीचा अवलंब केला पाहिजे असे मत आता वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे. कोरोना वर वैद्यकीय क्षेत्रात लाखो रुपयांचा खर्च एका रुग्णावर होत आहे. अशा परिस्थितीत आता अत्यंत कमी खर्चातील होमिओपॅथिक उपचार पद्धती यशस्वी होऊ लागली असून परभणी सह अनेक भागात असंख्य रुग्ण या उपचार पद्धतीमुळे बरे झाल्याची उदाहरणे समोर येत असतानाच परभणीतील 83 वर्षी आजीबाईंनी याच पद्धतीने कोरोना वर मात केली आहे.

परभणीच्या विष्णू नगरातील श्रीमती किशनप्यारी रामजीवन चांडक वय 83 रा विष्णू नगर परभणी यांना 16 एप्रिल रोजी ताप सोबत अंगदुखी, अशक्तपणा जाणवू लागला होता. लगेच त्यांची मोरेश्वर लॅब वरून Rapid Antigen Test रात्री उशिरा केली ज्यात त्या positive आली. घरी  स्वतंत्र खोली ज्यास स्वतंत्र attached स्वच्छतागृह नसल्याने डॉ पवन चांडक यांच्या क्लीनिक बाजूला अभ्यासिका सुरू केली आहे जी लॉकडाऊन मुळे बंद असल्याने तिथेच क्वारंटाईन व्हायच्या निर्णय झाला. शिवाय हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचे म्हटले की ते पीपीइ किट मधील डॉक्टर, हॉस्पिटलमधील वातावरण आणि औषधांच्या डोसेस बद्दल आजीना आधीच भीती होती. शिवाय वर्तमानपत्र, टीव्ही वरील कोरोना रुग्णांच्या दवाखान्यातील अनुभवांविषयी ऐकल्यामुळे तिच्या मनात एक प्रकारचा ताण होता म्हणूनच आम्ही होम आयसोलेशन चा निर्णय घेतला. 

तरी सुद्धा आमचे नातेवाईक डॉ अंकित मंत्री सर यांना होम आयसोलेशन च्या निर्णयाची कल्पना दिली व वेळोवेळी अपडेट्स  करणार असल्याचे कळवले. त्याप्रमाणे आज्जीला अभ्यासिकेत दाखल करून तिथेच होमिओपॅथिक औषधोपचार सुरू केला. सोबत दिवसातून 3 वेळा SPO2, TEMPERATURE पाहणे व रोज सकाळी ब्लड प्रेशर त्यांचा नातू डॉ पवन चांडक तपासत होते. आजीकडे लक्ष देता यावे म्हणून डॉ पवन चांडक क्लीनिक मध्येच मुक्कामी होते. या दरम्यान महत्वाच्या रक्त तपासणी CBC, CRP, D-DIMER, HRCT CHEST केले.

त्यांना हलका सकस आहार, जेवणात भाज्यांचे सूप यावर भर होता. तसेच फलाहार जसे केळी, सफरचंद, 2 गिलास लिंबू शरबत, 1 लिटर ORS असे नियमितपणे व 3 -4 लिटर पाणी सुरू होते. त्यामुळे त्यांना Dehydration चा त्रास झाला नाही. कुटुंब म्हणून नातेवाईकांचे, मित्र मंडळींचे फोन येत होते की कुठे ऍडमिट केले ? घरीच का आयसोलेट केले ? कोणता उपचार सुरू आहे ? Antibiotics दिल्या नाही का ? वगैरे त्यांना शांतपणे होमिओपॅथिक उपचार आणि तो पण घरच्याच डॉक्टरांच्या देखरेखिखाली सुरू आहे म्हटल्यावर समाधानाने शुभेच्छा द्यायचे.
 
पहिले 4 दिवस आजीला 99.5 ते 100.6 असा ताप होता जो होमिओपॅथी गोळ्यांच्या नियमितपणे डोस मुळे कोणतेही Patacrtemol, Antibiotics न घेता चौथ्या दिवशी कमी झाला. एके दिवशी ऑक्सिजन 90 पर्यंत आले होते. पण होमिओपॅथी मधील ऑक्सिजन इंप्रुव्ह करणारे होमिओपॅथिक प्रोटोकॉल नुसार औषध दिल्यावर फरक पडला. 5-6 दिवसानंतर त्यांचा अशक्तपणा बरा झाला. त्यांना आराम करून बोर होत होते म्हणून मित्र गोपाल व नेहा मुरक्या यांनी रामायण चे सर्व भाग असलेले इन्स्ट्रुमेंट दिले ज्यामुळे त्यांना नामस्मरण देखील झाले व आध्यात्मिक विरंगुळा देखील झाला. 

तरी त्यांचे नियमितपणे हरिपाठ सुरूच होते. कदाचित त्यामुळेच तर त्यांना सकारात्मक ऊर्जा मिळत होती. या 14 दिवसांत त्यांच्याशी संभाषणचे 2 व्हिडिओ तयार करून नातेवाईकांना त्यांच्या खुशालीची कल्पना दिली. पुढे योग्य होमिओपॅथिक औषधोपचार मुळे त्यांना CRP, Platelet Count, WBC Count, Lymphocytes count आणि D-Dimer मध्ये सकारात्मक बदल दिसून आला. 

11 व्या दिवशी छातीचा X-ray देखील नॉर्मल आला. तेंव्हा पासून त्यांना घरी जायची ओढ लागली होती पण 14 दिवसांच्या कालावधी पूर्ण होऊनच घरी जायचे म्हटल्यावर त्या देखील तयार झाल्या. या 14 दिवसांत त्या एकट्या असूनही कधी बोर व्हायले म्हणून चिडचिड केली नाही उलट हरिनाम जपत, नियमितपणे औषधी घेत, घरून आणलेल्या अन्नाचा न तक्रार करता आस्वाद घेतला. त्यांची ती दुर्दम्य इच्छाशक्ती, मी ठणठणीत बरी होणार हा आत्मविश्वास जगण्याकडे पहाण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आजच्या तरुणाई ला देखील लाजवेल. 

पहा मित्रांनो आमच्या 83 वर्षाच्या आज्जीने कोरोनाला हरवले ते पण कोणत्याही हॉस्पिटलमध्ये न जाता घरी राहून कोणतेही Antibiotics, Steroids, Anti-coagulants, Remedisavior न घेता पारंपरिक उपचार पद्धती अर्थात होमिओपॅथी, योग्य आहार, विश्रांती, हरिपाठ च्या माध्यमातून नामस्मरण आणि इच्छाशक्तीच्या जोरावर. आज घरातील सर्व व्यक्तीने त्यांचे पुष्पवृष्टी करत स्वागत केले. त्यांच्या घरी त्यांचा एक मुलगा जे सेवानिवृत्त बँक अधिकारी, सुनबाई, नातू व नात सून होमिओपॅथिक डॉक्टर आहेत.



Post a Comment

0 Comments