Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

मुलाचा मृत्यू झाल्याचे समजताच आईने सोडला जीव





उस्मानाबाद
➡️  हिंगळजवाडी तालुक्यातील रमाकांत उर्फ पापा मधुकर नाईकनवरे (वय 50) यांचे गुरुवारी करोनामुळे निधन झाले. यानंतर मुलाचा मृत्यू झाल्याचे समजताच रमाकांत यांची आई सुशीला मधुकर नाईकनवरे (वय 70) यांचेही निधन झाले. या दोन्ही माय-लेकावर हिंगळजवाडी येथील शेतात एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेमुळे परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झालं आहे. 
हिंगळजवाडी येथील पापा नाईकनवरे हे करोना पोसिटीव्ह असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. मुलाच्या निधनाची माहिती त्यांच्या मातोश्री सुशीला नाईकनवरे यांना दुःख अनावर होऊन त्यांनीही घरी जीव सोडला.



Post a Comment

0 Comments