Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

✴ महिलावर बलात्कार करणार्‍या आरोपीला 07 वर्ष सश्रम कारावास




 

परभणी ➡️ नांदेडला परत निघालेल्या नवविवाहितेला मोटारसायकलवर  जबरदस्ती बसवुन नेऊन अत्याचार करणार्‍या आरोपीला तिसरे सत्र न्यायाधीश व्ही.डी. कश्यप यांनी 07 वर्ष सश्रम कारावास आणि दंडाची आज शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अँड. मयुर साळापुरकर यांनी काम पाहिले.

नांदेड येथील महिला 8 ऑक्टोबर 2015 रोजी गंगाजी बापू देवस्थानला दर्शनास आली होती. तेथून ती नांदेडला परत जाण्याकरिता निघाली असता पिंपळगाव नाल्याजवळ दर्शन घेऊन परत जात असताना. आरोपी शेख शौकत शेख शरिफोद्दीन याने विवाहितेला तुझा गळा चिरतो अशी धमकी देत ब्लेडने डाव्या हातावर जखम करुन विवाहितेला बळजबरीने मोटारसायकलवर बसवुन पालम येथे आणले.

या ठिकाणी स्वतःच्या घरी डांबून ठेऊन बलात्कार केला. फिर्यादीने स्वतःची सुटका करुन आरोपी विरोधात पोलिसात तक्रार दिली. याचा तपास अंमलदार ए.जी. कोलते, शेजवळ तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे एकुण 08 साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी आणि वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली.

अंतिम युक्तिवादाने तिसरे सत्र न्यायाथीश डी.व्ही. कश्यप यांनी आरोपीला कलम 376 भादवि अन्वये दोषी ठरवून 07 वर्ष सश्रम कारावास, 05 हजार रुपये दंड, जबरदस्ती पळवुन नेल्याने 07 वर्ष सश्रम कारावास, 05 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 03 महिने सश्रम कारावास. कलम 506 मध्ये 02 वर्ष सश्रम कारावास, 05 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास 03 महिने सश्रम कारावासची शिक्षा सुनावली आहे. दंडातील रक्कमपैकी 10 हजार रुपये पिडीतेस आर्थिक सहाय्य म्हणुन देण्याचे आदेश केले आहेत. या प्रकरणात जिल्हा सरकारी अभियोक्ता ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅड. मयूर साळापुरकर यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली. पैरवी अधिकारी एस.व्ही. मनाले, कोट पैरवी अंमलदार टी.एस. राठोड व सुर्यवंशी यांनी मदत केली.




Post a Comment

0 Comments