Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

कोविडच्या लसीकरणाला घाबरू नका - सीईओ शिवानंद टाकसाळे यांचे आवाहन




परभणी ➡️ जिल्ह्यातील नागरिकांनी कोविडच्या लसीकरणाला न घाबरता आणि अफवांवर विश्वास न ठेवता प्रत्येकाने लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केले आहे. आज दिनांक 31 मार्च 2021 रोजी परभणी तालुक्यातील बाभूळगाव येथील आरोग्य उपकेंद्रांमध्ये 65 वर्षा वरील नागरिकांसाठी कोविड - 19 लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या उपस्थिती मध्ये गावातील 75 नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली.



ग्रामीण भागातील वयोवृद्ध मंडळींकडून कोविड - 19 लसीकरणा बद्दल समाधान व्यक्त होत असल्याची भावना दिसत आहे. आता उद्यापासून 45 वर्षा वरील नागरिकांनी देखील लसीकरणासाठी सक्रिय सहभाग नोंदविणे आवश्यक आहे.

        शिवानंद टाकसाळे

     मुख्य कार्यकारी अधिकारी

     जिल्हा परिषद, परभणी.

गावाला आजपर्यंत कोरोना पासून दूर ठेवल्याबद्दल शिवानंद टाकसाळे यांनी प्रशासकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, पदाधिकारी आणि गावकऱ्यांचे अभिनंदन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे ग्रामीण भागातील नागरिक व कोविडग्रस्त रुग्णांशी संवाद साधून त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस देखील करत आहेत. बाभूळगाव मधील वयोवृद्ध आजींशी शिवानंद टाकसाळे यांनी लस घेतल्या नंतर संवाद साधला यावेळी आपल्याला कुठल्याही त्रास होत नसून लस चांगली असल्याचे समाधान आजींनी व्यक्त केले.


यावेळी गट विकास अधिकारी अनुप पाटील, माता बाल संगोपन अधिकारी रावजी सोनवणे, विस्ताराधिकारी मधुकर पूर्णेकर, यु.टी. राठोड, पंचायत विस्तार अधिकारी जी एस गोरे, आरोग्य सहाय्यक वाघमारे, सरपंच गणेश दळवे, ग्रामसेवक नितीन पवार, मुख्याध्यापक श्रीमती किल्लेदार,  वैद्यकीय अधिकारी डॉ जुनेद, सर्व शिक्षक, आरोग्य कर्मचारी, लसीकरण करणारे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासह आशाताई, अंगणवाडीताई यांची उपस्थिती होती.





Post a Comment

0 Comments