Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

सिटीस्कॅनसाठी जादा पैसे आकारणाऱ्या खासगी डॉक्टरची जिल्हाधिकारीने केली चांगली कानउघडणी






परभणी ➡️ येथील जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी एका गरीब रुग्णांच्या सिटीस्कॅनसाठी जादा पैसे आकारणाऱ्या खासगी डॉक्टरची चांगली कानउघडणी केली. एका सर्वसामान्य नागरीकांचा फोन उचलून त्याला तातडीने मदत करण्याऱ्या जिल्हाधिकारी दीपक मुगळीकरांचे परभणी शहरातून कौतूक केले जात आहे. ही घटना 29 मार्च रोजी घडली आहे.
 
Record 👇👇👇
 


येथील इलेक्ट्रशियनचे काम करून स्वताचा व कुटूंबाचा उदरनिर्वाह चालविणारे नारायण रेवणवार यांच्या वडीलांसह भावाला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या ते दोघेंही आयटीआय येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. वडीलांचे सिटीस्कॅन करण्यासाठी नारायण रेवणवार हे परभणी शहराती एका नामवंत डायग्नोस्टीक सेंटरमध्ये गेले होते. त्या ठिकाणी त्यांना सिटीस्कॅनची फीस 5 हजार रुपये आकारण्यात आली. परंतू रेवणवार यांनी जिल्हाधिकार्‍यांनी 3 हजार रुपये घेण्याचे आदेश दिलेले आहे. अशी कल्पना संबंधीत डॉक्टरांना दिली. पंरतू डॉक्टरांनी मला तसे लेखी आदेश नाहीत. त्यामुळे मी फिस कमी करू शकत नाही, असे उत्तर रेवणवार यांना दिले.

आर्थिक अडचणीत असलेल्या नारायण रेवणवार यांनी तातडीने ही बाब जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना फोनव्दारे कळविली. जिल्हाधिकाऱ्यांनीही याची गंभीर दखल घेत संबधीत डॉक्टरांची फोनवरून कानउघडणी केली. सर्वसामान्यांना त्रास देवू नका असे सांगत तातडीने त्यांचा सिटीस्कॅन अहवाल रेवणवार यांना द्यावा असे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी आदेशानंतर  दिल्यानंतर रेवणवार यांना त्यांच्या वडीलांच्या सिटीस्कॅनचा अहवाल 03 हजार रुपये घेवून देण्यात आला. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी कोरोना काळात कुणी ही खासगी डॉक्टरांनी सर्वसामान्य नागरीकांना त्रास होईल असे वागू नये. शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणेच फिस आकारणी करावी असे आदेश दिलेले आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी घेतलेली तातडीची दखल जिल्ह्यात मात्र चर्चेचा विषय ठरली आहे. त्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.




Post a Comment

0 Comments