Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी पेठशिवणीच्या चेअरमनपदी डॉ सिद्धार्थ भालेराव यांची बिनविरोध निवड





परभणी ➡️ डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी पेठशिवणी तालुका पालमच्या चेअरमनपदी प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ सिद्धार्थ पांडुरंगराव भालेराव यांची बिनविरोध निवड झाली आहे. बुधवारी दि. 31 मार्च रोजी सूतगिरणीच्या संचालक मंडळाच्या सार्वत्रिक बैठकीत शासनाच्या परवानगीने ही निवड करण्यात आली आहे.

सूतगिरणीच्या च्या माध्यमातून पालम व परिसराचा औद्योगिक विकास साधणार - नवनिर्वाचित चेअरमन डॉ सिद्धार्थ भालेराव 



डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या माध्यमातून पालम व परिसराचा औद्योगिक विकास साधण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या माध्यमातून तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध सहकार क्षेत्रातील योजना आणून सूतगिरणीला विकासाच्या महत्वपूर्ण टप्प्यावर आणण्याचे कार्य आपण करणार आहोत. याकामी सर्व संचालक मंडळासह लोकप्रतिनिधींनी सहकार्य देऊन पालम व परिसराच्या विकासासाठी विकासात्मक वाटा उचलावा असे प्रतिपादन नवनिर्वाचित चेअरमन डॉ. सिद्धार्थ भालेराव यांनी निवड झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे.

सहकार क्षेत्रात मागील अनेक वर्षापासून अतिशय चांगल्या पद्धतीने चालवण्यात येणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या माध्यमातून पालम व परिसराच्या विकासात सूतगिरणीने ऐतिहासिक महत्त्व जपले आहे. सुगरणीचे माजी चेअरमन तथा दिवंगत माजी आमदार विठ्ठलराव गायकवाड व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय संघटक सरचिटणीस दिवंगत माजी चेअरमन ॲड. गौतमदादा भालेराव यांच्या कौशल्य संघटनेतून सूतगिरणीने सहकार क्षेत्रात आपला नावलौकिक कमावलेला आहे. 

या दोघांच्या पश्चात आगामी काळात सूतगिरणीच्या विकासात्मक वाटचालीच्या दृष्टीने शासन परवानगीने संचालक मंडळातील सार्वत्रिक बैठक बुधवारी दि. 31 मार्च रोजी सूतगिरणीच्या सभागृहात पार पडली. यावेळी एकुण 12 संचालक उपस्थित होते. या बैठकीत सर्वानुमते डॉ. सिद्धार्थ पांडुरंगराव भालेराव यांची सूतगिरणीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. या बैठकीस नवनिर्वाचित चेअरमेन डॉ. सिद्धार्थ भालेराव, दिवंगत माजी आमदार विठ्ठलराव गायकवाड यांच्या सुविद्य पत्नी तथा माजी जिल्हा परिषद सदस्य सविता गायकवाड, संचालक डॉ. प्रतिभा भालेराव, रणधीर राजे भालेराव, वैजनाथराव व्हावळे, रमेश शिनगारे, प्रा डॉ केशव जोंधळे आदी संचालकांची उपस्थिती होती. या बैठकीत चेअरमन पदी डॉ सिद्धार्थ भालेराव यांची निवड होताच सर्व संचालकांनी डॉक्टर भालेराव यांचा यथोचित सत्कार केला.







Post a Comment

0 Comments