Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणी जिल्हा ऐतिहासिक वारसा अभ्यासगटाची रामपुरी येथे पाहणी





परभणी
➡️ परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी नेमलेल्या परभणी जिल्हा ऐतिहासिक वारसा अभ्यास गटाने मानवत तालुक्यातील रामपुरी बु. येथे दिनांक 27 फेब्रुवारी 2021 रोजी भेट देऊन पाहणी केली.

रामपुरीला प्राचीन वारसा असून 'सांस्कृतिक ग्राम' म्हणून गावचा विकास करण्यासाठी सर्व ग्रामस्थ एकजुटीने प्रयत्न करत असून पुरातन शिल्प संग्रहालय निर्माण करण्यात येत आहे, असे मत जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश मं.यादव यांनी व्यक्त केले.

यावेळी सदर अभ्यास गटाने सुमारे दहा ते अकराव्या शतकातील पुरातन मल्लिकार्जुन मंदिर परिसर व गोदावरी काठावरील पुरातन मंदिर येथील पाहणी करून सर्व नोंदी घेतल्या. गोदावरी काठावर सतीशिल्प, वीरगळ इत्यादी पुरातन शिल्प आढळून आले. रामपुरी गावाला प्राचीन वारसा असून रामपुरी बु. हे एक *सांस्कृतिक ग्राम* म्हणून उदयास येऊ शकते असे अभ्यास गटाने चर्चेदरम्यान ग्रामस्थांना माहिती दिली.







Post a Comment

0 Comments