Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

आमदार मेघना बोर्डीकर नेतृत्वाखालील भाजपच्या महिला आघाडीचा परभणीत जोरदार रास्तारोको





परभणी ➡️ पुजा चव्हाण हिच्या मृत्यूची चौकशी करून दोषी व्यक्तींवर कारवाई करावी, तसेच वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा तात्काळ घेण्यात यावा, या मागणीसाठी शुक्रवारी (दि.27) राष्ट्रीय महामार्गावर भारतीय जनता पक्षाच्या महिला शाखेतर्फे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी आमदार मेघना बोर्डीकर, भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या जिल्हा महानगराध्यक्षा सुप्रिया कुलकर्णी, नगरसेविका मंगल मुद्गलकर, गीता सूर्यवंशी, छाया मोगले, विजया कातकडे, ललिता जाधव यांच्यासह नगरसेवक मधुकर गव्हाणे, संजय रिझवाणी, दिनेश नरवाडकर, गणेश देशमुख, संदीप शिंदे, अनंत गिरी, राजेश देशमुख, संतोष जाधव, अनुप गिरी, सुशीला डहाळे, वर्षा शिंदे, सारिका धुमाळ, भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, संजय रिझवाणी आदींसह असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

वसमत रस्त्यावरील भरोसे पेट्रोलपंपासमोर आमदार मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली पूजा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी व्हावी व मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. रास्तारोको आंदोलनामुळे दोन्ही बाजुंनी मोठ्या संख्येने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे वसमत रस्त्यारील दोन्ही बाजुंनी पक्ष पदाधिकार्‍यांनी ठिय्या मांडल्याने दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.




Post a Comment

0 Comments