Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालयांसह कोचिंग क्लासेस 04 मार्चपर्यंत बंद- जिल्हाधिकार्‍यांचे आदेश





परभणी ➡️ कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालय तसेच शिकवणी वर्ग (कोचिंग क्लासेस) दिनांक 01 ते 04 मार्च दरम्यान बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शनिवारी (दि.27) रोजी दिले.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने उपाययोजनांची जिल्हा प्रशासनाकडून अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेस दि. 01 ते 04 मार्चदरम्यान बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत. प्राध्यापकांनी महाविद्यालयात नियमित अध्यापनाचे काम ऑनलाईन पध्दतीने करावे, या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही माध्यमीक तसेच प्रथमिक शिक्षणाधिकारी व महापालिकेचे आयुक्त यांच्यावर राहील, असेही आदेशात नमूद केले आहे. सदरील ओदशाचे पालन न करणारी कोणतीही व्यक्‍ती, संस्था अथवा समूह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि आरतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल.




Post a Comment

0 Comments