Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

नांदेड जिल्ह्यात 80 व्यक्ती कोरोना बाधित तर एकाचा मृत्यू





नांदेड ➡️ शनिवार 27 फेब्रुवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 80 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 51 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 29 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 48 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 1 हजार 708 अहवालापैकी 1 हजार 614 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 23 हजार 564 एवढी झाली असून यातील  22 हजार 225 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 527 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 17 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

शुक्रवार 26 फेब्रुवारी 2021 रोजी हदगाव तालुक्यातील कोळी येथील 75 वर्षाच्या एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 598 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.    




Post a Comment

0 Comments