Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

घरकुलासाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सीईओ शिवानंद टाकसाळे यांचे शासनाकडून अभिनंदन





 सीईओ शिवानंद टाकसाळे 


परभणी
➡️ 
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या बेघर व कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या कुटुंबांना हक्काचे घरकुल मिळावे म्हणून जिल्ह्यात घरकुलासाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांचे शासनाने अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने महा आवास अभियान ग्रामीण हे अभियान दिनांक 20 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या कालावधीमध्ये राबविण्यात येत आहे. या अभियान कालावधीमध्ये महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत परभणी जिल्ह्याने उत्कृष्ट काम केल्याबद्दल ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे व्यक्तिशः अभिनंदन केले आहे. तसेच महा आवास अभियान ग्रामीण कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात शिवानंद टाकसाळे यांचा गौरव होणार असल्याचेही कळवले आहे.

महाराष्ट्र शासनाने शिवानंद टाकसाळे यांचे अभिनंदन केल्या बद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. परभणी जिल्ह्यामध्ये बेघर असलेल्या नागरिकांना स्वतःचे पक्के घर मिळावे म्हणून शिवानंद टाकसाळे यांनी जिल्ह्यातील अनेक गावांना भेटी देऊन घरकुल बांधकामा बाबत व त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी नागरिकांशी संवादही साधलेला आहे.

जिल्ह्यात घरकुल बांधकामाची मोहीम गतिमान करण्यासाठी काम केलेल्या जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक विजय मुळीक आणि त्यांच्या सर्व टीमचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी अभिनंदन केले आहे.




Post a Comment

0 Comments