Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

जिंतूर येथे किरकोळ वादातून मजुरावर प्राणघातक हल्ला, एका आरोपीच्या विरूद्ध गुन्हा दाखल





परभणी ➡️ जिंतूर येथील शिवाजी चौक परिसरातील एका देशी दारूच्या दुकाना समोरील रस्त्यावर एका 24 वर्षीय मजुराला धारदार हत्याराने वार करुन गंभीर जखमी केले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध 26 फेब्रुवारी रोजी जिंतूर पोलिस ठाण्यात एका आरोपीच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिंतूर शहरातील राम मंदिर परिसर निवासी राहणारा शेषराव बबनराव डपडे (24) नावाचा एक तरुण देशमुख यांच्या पेट्रोल पंपावर मजूर म्हणून काम करतो. शेषराव 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.15 वाजता मित्र कृष्णा देशमुख यांच्यासमवेत त्यांच्या घरी जात होते. त्याच दरम्यान शिवाजी चौक परिसरातील एका दारूच्या जवळ शेख वजीर उर्फ ​​साई शेख इब्राहिम (हिदायत नगर कजबा पेठ ) येत होता. शेषराव यांनी आपली मोटारसायकल थांबवली आणि शेख वजीर यांना समजावून सांगितले, तू मला न विचारता माझ्या मोटारसायकल घेऊन कुठे गेला होतास? यांच्यानंतर तु पुन्हा माझी मोटारसायकल घेऊ नको. असे म्हणताच शेख वजीरने शेषरावला शिवीगाळ व मारहाण करत धारदार हत्याराने वार करून गंभीर जखमी केले. आरोपी शेख वजीर यांनी जीवे मारण्याची धमकी देऊन घटनास्थळावरून पळ काढला. शेषराव डपडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी शेख वजीर उर्फ ​​साई शेख इब्राहिम याच्याविरूद्ध भादंवि कलम 424, 323, 404, 606 अन्वये जिंतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


  




Post a Comment

0 Comments