Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

एकात्मित खत व्यवस्थापन काळाची गरज जमीनीचे आरोग्य अबाधित ठेण्यास भेटते बळ





जिंतूर
➡️ राष्ट्रीय शास्वत शेती अभियाना अंतर्गत जमीन आरोग्य पत्रिका प्रशिक्षण मौजे धानोरा दे.ता. जिंतूर येथे बुुधवारी गावच्या सरपंच सगंगाबाई पंढरीनाथ घुगे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आले.

या प्रसंगी एस.पी.काळे तालुका कृषि अधिकारी,जिंतूर यांनी एकात्मिक खत व्यवस्थापनाद्वारे जमिनीचे आरोग्य अबाधित ठेवणे शक्य असल्याचे नमूद केले. त्यासाठी शेतातून निघणारा काडीकचरा,गवत, भुसा,धसकटे ई.जाळून न टाकता त्यापासून कंपोस्ट खत,गांडूळ खत तयार करून शेतात टाकावे,  हिरवळीची खते,जैविक खते वापरावीत म्हणजे जमिनीचा पोत सुधारून पिकास लागणारे सर्व अन्न घटक पुरेश्या प्रमाणात उपलब्ध होतात व त्यापासून सकस धान्य उत्पादित होत असल्याने माणसाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत नाही.या प्रसंगी डॉ.जाधव कृषी विद्यापीठ परभणी यांनी माती तपासणीचे महत्व या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
 
कार्यक्रम यशस्वी करणेसाठी मंडळ कृषी अधिकारी बोरी अडकिने, कृषी पर्यवेक्षक मानवते, कृषि सहाय्यक देशमुख बीटीएम अंभुरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषिमित्र रामेश्वर कुटे यांनी केले तर आभार प्रदर्शन अशोक खोलसे यांनी केले. प्रशिक्षणास गावातील महिला व शेतकरी मोठ्या संखेने हजर होते.



Post a Comment

0 Comments