Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

जवाहर विद्यालयात मराठी राजभाषा दिन अतिशय उत्साहात साजरा





परभणी ➡️ जिंतूर येेथील जवाहर विद्यालयात मराठी कवी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांची जयंती मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. 
 
 
प्रथमतः मराठी राजभाषा दिनाची शपथ घेतल्यानंतर अध्यक्ष प्राचार्य श्री.बळीराम वटाणे साहेब, प्रमुख पाहुणे एस.एस.इंगळे सर आणि मराठी विषय शिक्षक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकांचे अनावरण करण्यात आले. कु.श्रुती कंठाळे, कु.अनिता वायाळ, कु.ऋतुजा साबळे, कु.गायत्री देवकर, कु.वेदिका कनकदंडे यांनी भित्तीपत्रके तयार केली होती. यानंतर विविध विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली. 
 
यात कु. प्रियांशी खनपटे, कु.श्रुती मस्के, कु.वैष्णवी घुगे, कु.संबोधी घनसावध यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच  एम.जी.मोरे सरांनी ज्ञानेश्वरीच्या ओवीच्या माध्यमातून मराठी भाषेचे महत्व पटवून दिले. तर अध्यक्षीय भाषणात प्राचार्य बळीराम वटाणे सरांनी मराठी भाषेचा इतिहास सांगत प्रचार आणि प्रसार करण्याबद्दल सर्वांना आवाहन केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मराठी शिक्षक  एस.एस.सरनाईक सर,  एस.आर.घुले सर, एम.जी.मोरे सर,  ए.यु.देवकते सर,  व्ही.पी.सरोदे सर,  डी.एम.जगताप सर,  एस.पी.लांडगे सर,  एल.पी.ढगे सर यांनी परिश्रम घेतले तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन  कल्याण भोसले सर यांनी तर आभार आर.एस.चिभडे सर यांनी मांडले.



Post a Comment

0 Comments