Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शेतीपुरक उद्योगात पशु व दुग्ध व्यवसायाला चालना महत्वाची - पालकमंत्री अशोक चव्हाण





 💢 
 मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजनेतर्गंत पशु चिकित्सा अँम्बुलन्सचे लोकार्पण 

नांदेड  ➡️ जिल्ह्याच्या विविध विकास कामामध्ये ग्रामीण भागात शेतीला पुरक उद्योगाची जोड देण्यात व शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीमध्ये दुग्धव्यवसाय हा अत्यंत महत्वाची जबाबदारी पार पाडू शकेल. या व्यवसायाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यासाठी आता प्रत्येक तालुक्याला पुरेशा साधन सामुग्रीसह एक पशु चिकित्सा वाहन उपलब्ध करुन देण्याबाबत निश्चित प्रयत्न केले जातील असेप्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. 


जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागातील पशुपालकांना त्यांच्या आजारी पडलेल्या पशुधनाला त्यांच्या गावातच उपचार मिळावेत या उद्देशाने राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेला मिळालेल्या तीन पशु चिकित्सा व उपचार वाहनाचे लोकार्पण आज जिल्हा परिषदेच्या प्रागंणात त्यांच्या हस्ते करण्यात आले. या कोविड अंतर्गंत असलेल्या नियमाचे पालन करुन आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर
नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या महापौर मोहीनी येवनकरआमदार अमरनाथ राजुरकरआमदार मोहनराव हंबर्डेआमदार बालाजी कल्याणकरआमदार श्यामसुंदर शिंदेमाजी पालकमंत्री डी.पी. सावंतजिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकरमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगेमनपा आयुक्त डॉ. सुनिल लहानेपोलिस अधिक्षक प्रमोद शेवाळेजिल्हा परिषद उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती पदमा सतपलवारकृषी व पशुसंवर्धन सभापती बालासाहेब रावणगावकरशिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगेसमाजकल्याण सभापती रामराव नाईकमहिला व बालकल्याण सभापती सुशिलाबाई पाटील बेटमोगरेकरमाजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकरअतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शदर कुलकर्णीमाजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकरगोविंदराव नागेलीकरसुरेशराव अंबुलगेकर याच्यांसह जिल्ह्यातील पदाधिकारीविविध विभागांचे अधिकारी यांची उपस्थिती होती. 

इतर जिल्ह्याच्या तुलनेत आपल्या जिल्ह्यातील तालुक्याची संख्या व क्षेत्रफळ अधिक आहे. कोरोनाच्या या आव्हानात्मक काळात आपण जिल्ह्याच्या विकासासाठी 355 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी दिली आहे. यात आदिवासी विकास विभागामार्फत वेगळी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. यातून साकारणाऱ्या विविध शासकीय योजना जनतेपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहचल्यास खऱ्या गरजूपर्यंत पोहचता येईल असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट करुन माहितीशिक्षण व प्रसार यावर जिल्हा परिषदेने भर द्यावा असे सूचित केले. नांदेड जिल्हा परिषद ही वैविध्यपूर्ण योजना अंमलबजावणीत नेहमीच अग्रेसर राहिली आहे. जिल्ह्याने केलेल्या या विविध कामगिरीचे पालकमंत्री महोदयांनी कौतुक केले आहे. 

 या कार्यक्रमाच्या निमित्ताने बेटी बचाव बेटी पढाओपशु संवर्धन विभागमाझे गाव सुंदर गाव,  प्रत्येक गावाला स्मशानदहन-दफन भूमी यांची माहिती देणारे स्टॉल्स जिल्हा परिषदेच्यावतीने उभारण्यात आले होते. या स्टॉल्सलाही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी भेट देवून संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधला. शासकीय योजनाच्या माहितीचा प्रसार अशा पध्दतीने तालुका पातळीवर व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करुन त्यांनी जिल्हा परिषदेला सूचना केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी करुन जिल्हा परिषदेमार्फत हाती घेतलेल्या विविध नाविण्यपूर्ण योजनाची माहिती दिली. कृषी व पशु संवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर यांनी यावेळी आपल्या मनोगतात पशुसंवर्धन विकास विभागाच्या अनुषंगाने पालकमंत्र्याचे लक्ष वेधले. 

 यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या वारसांना दहा हजार रुपयांचे सानुगृह अनुदानाचे धनादेश संबंधिताच्या कुटूंबियाकडे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले. याच बरोबर पशुसंवर्धन विभागाची माहिती पुस्तिकाबाल विवाह प्रतिबंध अधिनियम अंतर्गत शपथमाझे गाव सुंदर गाव माहिती पुस्तिकेचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यातील स्मशानभूमीदहनदफन भूमी नसलेल्या गावांना गायरान जमिनीच्या‍ सनदचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पशुसंवर्धन विभागाच्यावतीने माहितीचे प्रदर्शन भरवण्यांत आले होते. श्रध्देय डॉ. शंकरराव चव्‍हाण व कै. कुसुमताई चव्हाण यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त दैनिक सत्य‍प्रभाने काढलेल्या विशेष पुरवणीचे प्रकाशन यावेळी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते‍ करण्यात आले. या कार्यक्रमाला पशुवैद्यकीय प्रादेशिक सह आयुक्त डॉ. मधुसुदन रत्नपारखेजिल्हा पशुसंवर्धन अधिकारी भुपेंद्र बोधनकरसहाय्यक आयुक्त डॉ. प्रविण घुलेडॉ. अरविंद गायकवाडडॉ. सपना पेंदुलवार यांच्यासह पदाधिकारीअधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.




Post a Comment

0 Comments