Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

आगाराच्या बसमध्ये वाहकाची आत्महत्या






नांदेड
➡️ माहूर एस.टी.आगाराचे वाहक संजय संभाजी जानकर (वय 55) यांनी आज (शुक्रवार) पहाटे चारच्या सुमारास आगाराच्या आवारात उभ्या असलेल्या एसटीमध्ये (एमएच- 20-बीएल-4015) मध्ये गळ्याला फास लाऊन आपली जीवनयात्रा संपविली.

याविषयी अधिक माहिती अशी की, दि. 23 फेब्रुवारी रोजी सदर वाहक हे माहूर -नांदेड फेरीवर असताना त्यांनी महागांवच्या प्रवाशांकडून पैसे पूर्ण घेतले. मात्र, तिकीट धनोड्यापर्यंतचेच दिल्याची बाब तपासणी पथकाच्या तपासणीत निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर केस दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी सुरू होती. पोलिसांनी पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रूग्णालयात पाठविले असून, मृत जानकर यांच्या खिशात चिट्ठी सापडली असल्याची माहिती आगारप्रमुख व्ही.टी.धुतमल यांनी दिली.




Post a Comment

0 Comments