Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

शुक्रवार परभणी 33 आणि नांदेड 75 कोरोना रुग्णांची भर







परभणी जिल्हात शुक्रवारी 33 व्यक्ती कोरोनाबाधित, एका व्यक्तीचा मृत्यू  

परभणी ➡️ शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 26) सायंकाळी सात वाजेपर्यंत 33 व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या आहेत. 59 कोरोनामुक्त व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला. तर एका कोरोनाबाधित पुरूषाचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून प्रेसनोटद्वारे देण्यात आली. रुग्णालयातील कक्षात 237 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 324 कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत 8 हजार 448 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी 7 हजार 887 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. रुग्णालयातर्फे आतापर्यंत 1 लाख 24 हजार 22 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात 1 लाख 15 हजार 18 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर 8 हजार 292 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह, 572 अनिर्णायक व 140 नमुने नाकारल्या गेले असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रसिध्द केलेल्या प्रेसनोटद्वारे कळविले आहे.


नांदेड जिल्ह्यात 75 व्यक्ती कोरोना बाधित तर दोघांचा मृत्यू  

नांदेड  ➡️ शुक्रवार 26 फेब्रुवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 75 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 50 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 25 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 46 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आज दोघांचा मृत्यू   

बुधवार 24 फेब्रुवारी 2021 रोजी शास्त्रीनगर नांदेड येथील 59 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालय येथे तर शुक्रवार 26 फेब्रुवारी 2021 रोजी लोहा तालुक्यातील कलंबर येथील 74 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 597 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

46 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 4, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 27,  गोकुंदा कोविड रुग्णालय 4जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 1मुदखेड तालुक्यातर्गत 4खाजगी रुग्णालय 6 असे एकूण 46 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.43 टक्के आहे.   

75 व्यक्तींबाधितांमध्येकोरोना बाधितांची भर 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 35,  देगलूर तालुक्यात 1, माहूर तालुक्यात 3, हदगाव तालुक्यात 1, अर्धापूर 1, नांदेड ग्रामीण 4, किनवट तालुक्यात 2, मुखेड तालुक्यात 2लोहा तालुक्यात 1 असे एकुण 50  बाधित आढळले. ॲटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 11, किनवट तालुक्यात 4,  अर्धापूर तालुक्यात 4नांदेड ग्रामीण 2माहूर तालुक्यात 2,भोकर तालुक्यात 2  असे एकूण 25 बाधित आढळले.

496 बाधितांवर औषधोपचार सुरु 

जिल्ह्यात 496 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 22, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 56, किनवट कोविड रुग्णालयात 20, मुखेड कोविड रुग्णालय 6, हदगाव कोविड रुग्णालय 6महसूल कोविड केअर सेंटर 21देगलूर कोविड रुग्णालय 7, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 239, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 72, खाजगी रुग्णालय 47 आहेत. आजच्या 1 हजार 553 अहवालापैकी 1 हजार 403 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 23 हजार 484 एवढी झाली असून यातील 22 हजार 177 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 496 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 16 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 





Post a Comment

0 Comments