Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणी जिल्ह्यात 33 व्यक्ती कोरोनाबांधित तर 56 कोरोनामुक्त व्यक्तींना दिला डिस्चार्ज





परभणी ➡️  जिल्ह्यात रविवारी (दि. 28) सायंकाळी 05 वाजेपर्यंत 33 व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या आहेत. 56 कोरोनामुक्त व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला तर 01 कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून प्रेसनोटद्वारे देण्यात आली. 

जिल्हा शासकीय रुग्णालयातील कक्षात 195 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 325 कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत 8 हजार 548 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी 8 हजार 028 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. रुग्णालयातर्फे आतापर्यंत 1 लाख 26 हजार 130 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात 1 लाख 17 हजार 021 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर 8 हजार 395 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह, 574 अनिर्णायक व 140 नमुने नाकारल्या गेले असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रसिध्द केलेल्या प्रेसनोटद्वारे कळविले आहे.

व्यापारी व व्यावसायिक नागरिकांच्या कोरोना तपासणी करून घ्यावी 

- जिल्हादंडाधिकारी दी. म. मुगळीकर यांचे आवाहन

कोरोना अर्थात कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करुन परभणी येथे व्यापारी, व्यावसायिक नागरिकांची तपासणी तात्काळ व सुलभ व्हावी यासाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेंतर्गत परभणी शहरातील वैष्णवी मंगल कार्यालय, कल्याण मंडपम शेजारील मनपा हॉस्पिटल व जुनापेडगाव रोडवरील इनायतनगर- हॉटेल मंजिरी जवळील आरोग्य केंद्रावर आरटीपीसआर व रॅपीट अँटिजन टेस्ट कॅम्प आयोजित केला आहे. शहरातील व्यापारी, व्यावसायिक नागरिकांनी त्यांच्या सोईनुसार सदर केंद्रावर जाऊन तात्काळ कोरोना तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी दी. म. मुगळीकर यांनी केले आहे.









Post a Comment

0 Comments