Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

आजपासून 60 वर्षावरील तसेच 45 ते 59 वयोगटातील कोमॉर्बीड आजार असलेले व्यक्ती घेऊ शकता निर्धारित शुल्क भरून कोविड लस लाभ





परभणी ➡️ आज 01 मार्च 2021 पासुन नोंदणी न झालेले HCW/FLW, 60 वर्षावरिल तसेच 45 ते 59 वयोगटातील कोमॉर्बीड ( अनुवंशिक आजार असलेले) व्यक्‍तींना एकूण  11 ठिकाणी  कोवीड 19 लसीकरण लाभ घेता येणार आहे.

राज्य स्तरावरुन प्राप्त सुचनानुसार परभणी जिल्ह्यात 01 मार्च 2021 पासुन नोंदणी न झालेले 60 वर्षावरिल तसेच 45 ते 59 वयोगटातील कोमॉर्वीड (अनुवंशिक आजार असलेले) व्यक्‍तींना कोवीड 19 लसीकरण प्रत्यक्ष ठिकाणी नोंदणी करुन तसेच स्वतः ऑनलाईन नोंदणी करुन लस घेता येणार आहे. यासाठी भारत सरकार कडुन कोवीन अँपमध्ये सुविधा निर्माण करण्यात आली आहे. यामध्ये ज्या नोंदणीकूत यांचा 01 ला डोस व 02 रा डोस राहिलेला आहे, त्यांना देखील लसीकरण करता येणार आहे. कोमॉर्वीड (अनुपंगीक आजार असलेले) व्यक्तींना नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायिक यांचेकडुन प्रमाणपत्र लसीकरणा वेळी सादर करणे आवश्यक आहे.

दिनांक 01 मार्च रोजी जिल्हा रुग्णालय,परभणी/ सर्व ग्रामिण व उपजिल्हा रुग्णालय तसेच मनपा अंतर्गत 02 (इनायत नगर व जायकवाडी) असे 11 ठिकाणी कोवीड 19 लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले असुन सदर ठिकाणी उपरोक्‍त लाभार्थ्यांनी लसीकरण करुन घ्यायचे आहे. तसेच जे खासगी रुग्णालये महात्मा फुले जनआरोग्य योजना/ आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना इत्यादी अंतर्गत नोंदणीकृत आहेत. तेथे देखील कोवीड लसीकरण केंद्र सुरु करण्याच्या सुचना प्राप्त झाल्या असुन परभणी जिल्ह्यात असे एकुण 04 रुग्णालये (स्पर्श रुग्णालय, परभणी/ स्वाती क्रिटकल केअर सेंटर, परभणी / मानवत मल्टीस्पेशालिटी, मानवत/ डॉ. प्रफुल्ल पाटील मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल, परभणी) असुन त्यांनी लाभार्थ्याकडुन रु 250/- प्रती डोस घ्यावयाचे असुन यामध्ये रुग्णालयीन फिस रु. 100/- व लस किंमत रु. 150/- आहे. सदर रु. 150/- शासनाच्या खातेमध्ये जमा करावयाचे असुन याप्रमाणात संबंधित खाजगी रुग्णालयास शासनातर्फे लस वितरित केली जाणार आहे.

तसेच खाजगी रूग्णालयांचे कोवीन 2.0 अंतर्गत नोंदणीचे कामकाज प्रगतीपथावर असुन लवकरच त्याठिकाणी लसीकरण सुरु होणार आहे. तसेच येत्या 02 मार्च पासुन जास्तीत जास्त प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण सत्र घेतली जाणार आहे. तरी उपरोक्‍त लाभार्थ्यांनी अधिकृत ओळखपत्र सोबत ठेऊन लसीकरण करुन घेण्याचे आवाहन  जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर केले आहे.





Post a Comment

0 Comments