Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

आज मनपाच्यावतीने पोलिओ डोस कार्यक्रमांचे आयोजन





परभणी ➡️ शहर महानगरपालिकेच्या वतीने 0 ते 5 वयोगटातील बालकांना पोलिओचा डोस न चुकता रविवारी (दि.31) जानेवारी 2021 रोजी महानगरपालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रात, शहरातील अंगणवाडीमध्ये, बसस्थानक, रेल्वे स्थानक, शहरातील टोलनाके, सर्व रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र या ठिकाणी जावून द्यावा. सकाळी आठ ते सायंकाळी 5 पर्यंत पोलिओचा डोस देण्यात येणार आहे.  

आज सकाळी 9.30 वाजता जायकवाडी परिसरातील नागरी आरोग्य केंद्रात महापौर अनिता सोनकांबळे, उपमहापौर भगवानराव वाघमारे, उपायुक्त प्रवीण गायकवाड, स्थायी समितीचे सभापती गुलमीर खान, सभागृह नेते सय्यद समी उर्फ माजू लाला, आरोग्य सभापती कलीम अन्सारी यांच्या उपस्थितीत उद्घाटन आहे. तरी 0 ते 5 वयोगटातील बालकांना पोलिओचा डोस द्यावा, असे आवाहन महापौर सौ.अनिताताई सोनकांबळे, आयुक्त देविदास पवार, आरोग्य अधिकारी डॉ.कल्पना सावंत, डॉ.आरती देऊळकर यांनी केले आहे.





Post a Comment

0 Comments