Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणी शहरातील थोडक्यात बातमीपत्र





💢 मनपाच्या वतीने हुतात्मा दिन आयोजित


परभणी ➡️ शहर महानगरपालिकेच्या वतीने शनिवारी दि.30 जानेवारी रोजी हुतात्मा दिन पाळण्यात आला. यावेळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमहापौर भगवान वाघमारे, सहाय्यक आयुक्त शिवाजी सरनाईक,नगरसचिव विकास रत्नपारखे, भारत सोळंके, रमेश चव्हाण, आर.बी.कानोडे, उमेश जाधव, कैलास ठाकूर, रंगनाथ गरूड आदीची उपस्थिती होती.


💢 राहटीच्या मुख्य राइजिंग लाइनला राजगोपालचारी उद्यान येथील नवीन टाकीला जोडणीचे कार्य आरंभ


परभणी ➡️ राजगोपालचारी उद्यान येथील नवीन टाकीला राहटी येथील येणाऱ्या मुख्य राइजिंग लाइनला सुपर मार्केट भगवती हॉटेल समोर आज जोड़णी करण्यात येत आहे. या प्रसंगी आज मनपा चे अभियंता, बालाजी सोनुले, जीवन प्रधिकरणचे बाळकृष्ण देशमुख, बाळासाहेब कोरे, करन गायकवाड़, हेमंत दापतेकर, सुमित जाधव व प्रभाग 5 चे जनसेवक रितेश जैन आदी उपस्थित होते. या जोडणी नंतर बऱ्याच वर्षा पासून प्रतिक्षेत असणारी राजगोपालचारी उद्यान मधील टाकी लवकर कार्यन्वित होईल.


💢दर्गा परिसरातील मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करताना मनपा कर्मचारी नागरिककांची गर्दी 


परभणी ➡️ परभणी शहरातील दर्गा परिसरातील प्रभाग क्र, 11 मधील काज़ी बाग एक मिनार परीसरातील व दर्गा रोड येथील मोकार कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात आला. यावेळी सलीम इनामदार, जेष्ठ नागरिक खुतूब भाई शेख, सदाम मोसीन खान, शोहेब इनामदार, अलीम खान सलीम खान व मनपा चे कोदवाडा प्रमुख विनय ठाकूर यांच्या मार्गदर्शना खाली मनपा  कर्मचारी मोहन गायकवाड प्रशांत गायकवाड मुकिंद जाधव आकाश जाधव यांची उपस्थिती होती




Post a Comment

0 Comments