Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

अधीक्षक कार्यालयात विनाकारण येणार्‍या अधिकारी - कर्मचार्‍यांवर होणार कारवाई, तर आज पोलीस दलाचे दोन कर्मचारी निलंबित





💢 पोलिस अधीक्षक जयंत मीना यांचा दणका

परभणी ➡️ पोलिस अधीक्षक कार्यालयात अधिकारी - कर्मचार्‍यांनी विनाकारण फिरू नये, अन्यथा अशा अधिकारी - कर्मचार्‍यांना शिस्तभंगाच्या कारवाईस सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी दिला आहे. दुसरीकडे जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी सेलू व मानवत पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एका कर्मचाऱ्यास शनिवारी (दि.30) निलंबित केले. 

पोलिस अधीक्षक कार्यालयातील विविध विभागात, कार्यालयात काही अधिकारी - कर्मचारी सातत्याने येऊन तेथील कर्मचार्‍यांना भेटत असल्याची बाब पोलिस अधीक्षकांच्या निदर्शनास आली आहे. विशेष म्हणजे पोलिस अधिकारी - कर्मचार्‍यांच्या बदल्या, रजा, पदोन्नती यासह अन्य प्रशासकीय कामांसाठी अधीक्षक कार्यालयात त्या-त्या विभागातून वेळेत कामे पूर्ण केल्या जातात. मात्र, तरीही काही जण येथेच घुटमळत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या अधिकारी - कर्मचार्‍यांसाठी परिपत्रक काढून अशा अधिकारी - कर्मचार्‍यांना पायबंद घालण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीचे ड्युटी पास असल्याशिवाय पोलिस अधिकारी - कर्मचार्‍यांना कार्यालयात येता येणार नाही. विनाकारण पोलिस अधिकारी - कर्मचारी पोलिस अधीक्षक कार्यालयातील विभागांत फिरताना आढळल्यास त्यांच्याविरूध्द शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा पोलिस अधीक्षक जयंती मीना यांनी दिला आहे.

 💥  दोन पोलिस कर्मचारी निलंबित     


जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी सेलू व मानवत पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एका कर्मचाऱ्यास शनिवारी (दि.30) निलंबित केले. पोलीस दलाची प्रतिमा मलिन होईल असे कृत्य त्या दोघांनी केल्याचा ठपका पोलीस अधीक्षकांनी निलंबनाच्या आदेशात नमूद केला आहे.

मानवत पोलीस ठाण्यातील कर्मचारी रसूल दाऊद शेख यांनी अवैध दारू विक्रेत्यासह गुटखा विक्री करणाऱ्याकडून पैसे वसूल करीत कर्तव्यात कसूर केल्याचा तसेच अवैध धंदे चालकांवर अंकुश ठेवण्याऐवजी त्यांच्याकडून पैसे वसूल करून बेकायदेशीर कृत्य करून पोलीस दलाची प्रतिमा मलीन केली असल्याचे म्हटले आहे. तर सेलू ठाण्यातील कर्मचारी संजय साळवे यांनी एका परित्यक्त्या महिलेशी जवळीक निर्माण करत शारीरिक संबंध ठेवले. निराधार पीडित महिलांना संरक्षण देण्याऐवजी त्यांच्या एकटेपणाचा गैरफायदा घेतल्याने साळवे यांना निलंबित केल्याचे आदेशात म्हटले आहे.




Post a Comment

0 Comments