Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

जवाहर विद्यालयात हुतात्मा दिनानिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली





परभणी
➡️  जिंतुर येथील जवाहर विद्यालयात भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वाचे योगदान असणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव तथा विद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी श्री.के.डी. वटाणे साहेब, प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे प्राचार्य श्री.बळीराम वटाणे सर, जेष्ठ शिक्षक श्री.एस.एस.इंगळे सर व्यासपीठावर उपस्थित होते.


प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर संगीत विभागाच्या वतीने वैष्णव जन तो तेणे कही ये जे हे गीत सादर करून आदरांजली वाहिली. तसेच संस्कृत विषय शिक्षक श्री.प्रदिप शास्त्री महाजन सर यांनी संस्कृत सुभाषिताच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. तर प्राचार्य श्री.बळीराम वटाणे सरांनी विद्यार्थ्यांना राष्ट्राबद्दल आदर बाळगणे आणि थोर पुरुषांच्या चरित्राचे वाचन करण्याचे आवाहन करत मार्गदर्शन केले. 
यानंतर सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी दोन मिनिटं स्थब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.कल्याण भोसले सर यांनी केले तर आभार श्री.प्रदीप चव्हाण सर यांनी मांडले.




Post a Comment

0 Comments